मुंबई - भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज पहाटे निधन झाले. गेले काही दिवस त्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत होत्या. शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (lata mangeshkars death)लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर उपचारासाठी त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनावर लता मंगेशकर यांनी मात केली तरी त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी ८.१२ वाजता त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झक्याचे डॉ. समदाणी यांनी सांगितले. लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी कळताच त्या भारतरत्न असल्याने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला हजारो लोक येण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, रश्मी ठाकरे, छगन भुजबळ, सिने अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. 

Post a Comment

Previous Post Next Post