ट्रॅफिकमुळे ३ टक्के घटस्फोट, हा अमृता फडणवीस यांचा जावई शोध - महापौर किशोरी पेडणेकर

0


मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई मधील ट्राफिक मुळे तीन टक्के घटस्पोट होतात असे वक्तव्य केले आहे. त्यावर अमृता फडणवीस यांनी हा जावईशोध कुठून लावला असा प्रश्न मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. त्या सामान्य महिला असतील तर त्यांनी केंद्रांवरही बोलावे असे आवाहन महापौरांनी केले आहे. 

अमृता फडणवीस यांनी मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे तीन टक्के डिव्होर्स होतात असे वक्तव्य केले आहे. आपण सामान्य स्त्री म्हणून बोलत असल्याच्या त्या म्हणाल्या आहेत. आम्ही त्यांना कुठल्या भूमिकेत बघायचे. सामान्य स्त्री की माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून बघायचे असा प्रश्न महापौरांनी केला. जे लोक ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रावर त्यांनी काम करावे. २०१९ ला जे राजकीय बदल झाले त्यावरून मला वाटत होत भाजपमधील पुरुषच हैराण होते. पण आता घरच्या महिला देखील हैराण झाल्या आहेत. अमृता फडणवीस म्हणाल्या मी सामान्य महिला मग त्यांनी केंद्रातील विषयावर बोलावे. केंद्रातून राज्याला काय फायदा होतो त्यावरही त्यांनी बोलावे असे आवाहन महापौरांनी केले. त्यांनी हा जावई शोध कुठून लावला. असे जावई शोध करून मुंबई किंवा महाराष्ट्राला मलिन करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन महापौरांनी केले. 

काय म्हणाल्या अमृता फडणवीस -
महाराष्ट्रात वैयक्तिक कमेंट कोणावरही व्हायला नको, दुसरं राजकारणातल्या महिलांवरती अनेक कमेंट केल्या जातात. परंतु ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे, त्यावर कोणीही अजिबात कमेंट करू नये. महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला कोणतही काम जमतं नसल्याचं आपण पाहतोय, मेट्रोचं काम सुध्दा तसंच पडून आहे. तसेच एसटी कर्मचा-यांचा प्रश्न, मी सामान्य माणूस म्हणून बोलत आहे. जिथं गरजं आहे, तिथं राज्य सरकारने लक्ष द्यावं. भाजपा आणि आरएसएसचे लोक महिलांचा अधिक सन्मान करतात. आज मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे 3 टक्के डिव्होर्स होतात, त्यामुळं राज्य सरकारने त्याच्या चुकांकडे अधिक लक्ष घालावं असं मी सल्ला देते असे अमृता फडणवीस म्हणाल्या. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)