#Corona मुंबईत कोरोनाचे १६७ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद

JPN NEWS
0


मुंबई - मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन आज १६७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.  मंगळवार, बुधवार, गुरुवारनंंतर आज रविवारी चौथ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली असून  गेल्या दोन वर्षात एकूण १६,६८७ मृत्यूची नोंद झाली आहे. 

आज दिवसभरात कोरोनाच्या १६७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आढळलेल्या नव्या १६७ रुग्णांमधील १९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील ५ जणांना ऑक्सिजनची गरज लागली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या १० लाख ५५ हजार ५६१ वर पोहोचली आहे. तर २८६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १० लाख ३४ हजार ४९३ वर पोजळकरुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या एक हजार ५११ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी ३,०९७ दिवसांवर गेला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !