पहिल्या दिवशी ३०० हकरती सूचनांवर सुनावणी पूर्ण

0


मुंबई - प्रभाग रचनेवर मंगळवार, २२ फेब्रुवारीपासून सुनावणी सुरु झाली असून पहिल्या दिवशी पश्चिम उपनगरातील ३९० अर्जदारांना बोलवण्यात आले होते. यापैकी ३०० लोक उपस्थित होते. तर बुधवारी शहर व पूर्व उपनगरातील हरकती सूचनांवर सुनावणी होणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. (the hearing on 300 suggestions was completed)

प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवणाऱ्या ८१२ हरकती सूचना प्राप्त झाल्या होत्या. यावर मंगळवारपासून नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सुनावणीला सुरुवात झाली. अप्पर सचिव वित्त विभाग, विभागीय आयुक्त, दोन्ही जिल्हाधिकारी व पालिका आयुक्त यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसमोर मंगळवार, २२ फेब्रुवारीपासून सुनावणीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३९० पैकी ३०० अर्जदार उपस्थित होते. तर उद्या बुधवारी शहर व पश्चिम उपनगरातील हरकती सूचनांवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, हरकती सूचनांवर सुनावणी पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल समिती निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)