Type Here to Get Search Results !

दादर, माटुंगा, माहिम, वरळी, प्रभादेवीत ३० तास पाणी पुरवठा बंदमुंबई - मुंबईला पाणीपुरवठा ( Water Cut Across Mumbai ) करणाऱ्या भातसा तलावाच्या जलविद्युत स्थानकात ( Bhatsa power station ) तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. त्यात आता लोअर परळ भागात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी १४ मार्च ते १५ मार्चपर्यंत ३० तासांसाठी दादर, परळ, वरळी, माहिम, माटुंगा, प्रभादेवीत तब्बल ३० तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या जल विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेतर्फे लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम १४ मार्च रोजी सकाळी ८ ते १५ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत जल अभियंता विभाग खात्यामार्फत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत महापालिकेच्या जी/दक्षिण विभागात डिलाई रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग तसेच जी/उत्तर विभागात संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभागात ३० तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

तर जी/दक्षिण विभागात महालक्ष्मी, धोबीघाट, सातरस्ता या भागात १५ मार्च रोजी पहाटे ४ ते सकाळी ७ या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. सदर विभागातील नागरिकांनी जल वाहिनी दुरुस्ती कामाला सुरुवात होण्यापूर्वीच आवश्यक पाण्याचा साठा करुन त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad