Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ऐतिहासिक बुध्द लेण्या अतिक्रमणापासून वाचवा - भिमराव आंबेडकर यांचे आवाहनमुंबई - देशातील बुध्द लेण्या सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असतांना अनेक ठिकाणी अतिक्रण झाले आहे. आता बौध्द समाज जागृत झाला असून समाजाने नियमितपणे बुध्द लेण्यावर जाऊन आपला ऐतिहासिक धरोहर टिकविणे व त्या अतिक्रमणपासून वाचावाव्यात असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव आंबेडकर यांनी केले. (Historical Buddha caves should be protected from encroachment)

समता सैनिक दलाच्या मुंबई प्रदेशच्यावतीने मंगळवारी माघ अमावस्या निमित्त कान्हेरी लेणी, नॅशनल पार्क, बोरिवली येथील आयोजीत कार्यक्रमात भिमराव आंबेडकर यांनी आवाहन केले. भिमराव आंबेडकर यांनी पुढे  सुप्पारक स्तूप, नालासोपारा या बुद्ध लेणीस भेट दिली. ते पुढे असे म्हणाले, भारतीय बौद्ध महासभेने आता प्रत्येक वर्षावासाची सुरुवात बुध्द लेण्यावरून केली आहे. त्याप्रमाणे समाजानेही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे. 

यावेळी भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सचिव व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी भिमराव यांच्याशी चर्चा करून समता सैनिक दलाच्यावतीने देशातील प्रत्येक बुद्ध लेणी येथे समता सैनिक दलाची माघ अमावस्याला मानवंदना दिली जाईल व भारतीय बौद्ध महासभा आणि स्थानिक संघटना, समाज बांधवांनी मिळून येथे कार्यक्रम घेतला जाईल असे सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom