राज्यपालांनी विशेषाधिकार वापरून डॉ. पोखरणा यांचे निलंबन केले रद्द

0


मुंबई : अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात आले होते. निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना करण्यात आली. यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राज्य सरकारकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. ठाकरे सरकारने अहमदनगर जिल्हा रुग्णालय जिल्हा शल्यचिकित्सक पोखरणा यांचे निलंबन रद्द केल्याचा निर्णय राज्यपालांनी आपला विशेषाधिकार वापरून रद्द केल्याचे सांगितले जात आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालय जळितकांड प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे राज्य शासनाकडून निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर डॉ. सुनील पोखरणा यांनी दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी या निलंबनाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींना अनुसरून राज्यपाल महोदयांकडे दाद मागितली होती.

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात कुठल्याही विशेषाधिकारांचा वापर केला नसल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णत: निराधार व कल्पित असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)