Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महाविद्यालयीन १८ वय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी सक्तीची करा - प्रकाश गंगाधरे



मुंबई - महाविद्यालयात ( College ) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेत समाविष्ठ करणे व १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना निवडणुक नोंदणी सक्तीची करून त्यांना ओळखपत्र मिळावे अशी मागणी करणारे पत्र भाजपचे मुलुंडमधील माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे (Prakash Gangadhare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तसेच दिल्ली व महाराष्रष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोगाला पाठवले आहे. (Make voter registration compulsory for College students)
    
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा , राज्य विधान सभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तथा नगर परिषद पंचायत समित्या आधी निवडणुकांकरता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी आणि मतदार याद्या सुधारित करणे मतदारांनी यांच्या नावातील बदल करणे आदींची नोंदणी करण्याचे काम हाती घेतले जाते . या नवीन मतदारांची नोंदणी करताना निवडणूक आयोगाच्या वतीने मोहीम राबवली जाते. या मोहिमेमध्ये विविध राजकीय पक्ष पुढाकार घेत नव मतदारांची नोंदणी करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात. परंतु बऱ्याच मतदारांना राजकीय पक्षांच्या सानिध्यात न येता स्वतंत्रपणे मतदान नोंदणी करण्याची इच्छा असते. 
     
अशा प्रसंगी १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदाराला आपले नाव मतदार यादीत  नोंद करण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यालयात जाऊन नोंदणी अर्ज द्यावा लागतो. त्यानुसार त्याची नोंदणी केली जाते. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान नोंदणीची प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली असली तरीही बऱ्याच मतदारांना या ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया ज्ञात नसते. असे १८ वर्षे पूर्ण झालेले उमेदवार नोंदणी करण्यासाठी पुढे येत नाहीत किंबहुना त्यांना योग्य असे मार्गदर्शन होत नाही, त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवीन उमेदवारांची नोंदणी करतात उमेदवारांना निवडणूक कार्यालयात येऊन नोंदणी करायला लावण्या ऐवजी या तरुणांना ज्या महाविद्यालयांमध्ये ते शिकत आहेत त्या ठिकाणी मतदार नोंदणीची प्रक्रिया राबवली जावी. जेणेकरून महाविद्यालयातून शिक्षण घेत असलेल्या आणि महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक तरुण आणि तरुणीला आपले नाव मतदार यादीत नोंदवता येईल. असे प्रकाश गंगाधरे यांनी आपल्या पात्रता नमूद केले आहे.           

असे केल्याने केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांना यासाठी विशेष मनुष्यबळ लावण्याची किंबहुना त्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची गरज भासणार नाही. निवडणूक आयोगाच्या माध्यमातुन प्रत्येक १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला शिकत असलेल्या ठिकाणीच अर्थात महाविद्यालयांमध्ये नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होईल. व सदर मोहीम शंभर टक्के पूर्ण होऊ शकते . 
सद्यस्थितीत मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे राबवली जात नाही किंबहुना त्याला पूर्ण प्रतिसाद मिळत नाही त्यांनी अठरा वर्षाच्या वरील सर्व उमेदवारांची मतदार नोंदणी ही महाविद्यालयांमध्ये करण्याची सुविधा देण्याचा प्रयत्न करत याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जावा आणि त्यात महाविद्यालयांना १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी करणे महाविद्यालयांना सक्तीचे करावे .असेही प्रकाश गंगाधरे यांनी पत्रात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom