Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

१५ तासानंतर रेल्वेसेवा रुळावर


मुंबई  -  मध्य रेल्वेच्या दादर- माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी, रात्री ९.४५ वाजता दोन एक्प्रेस एकाच ट्रॅकवर आल्याने पदुचरी एक्स्प्रेसचे तीन डब्बे रुळावरून घसरून अपघात झाला. याचा फटका रेल्वेसेवेला बसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मध्य रेल्वेची वाहतूक विस्ककळीत झाल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.  एक्प्रेसचे घसरलेले डबे पुन्हा रुळावर आणण्यास मध्य रेल्वेला तब्बल १५ तासानंतर यश आले. शनिवारी दुपारी सव्वा एक वाजता ठप्प झालेली रेल्वेसेवा पूर्ववत झाली. 
              
माटुंगा - दादर रेल्वे स्थानका दरम्यान गदब एक्प्रेस व पदुचरी एक्स्प्रेस या दोन एक्स्प्रेस एकाच ट्रॅकवर आल्याने अपघात झाला. पदुचरी एक्स्प्रेस सीएसएमटीच्या दिशेने जात होती, त्याचवेळी कल्याणच्या दिशेने येत असलेली गदग एक्स्प्रेस ट्रॅक क्रॉसिंगवर एकाच ट्रॅकवर आल्या. यावेळी गाडीची धडक होऊ नये म्हणून पदुचरी एक्स्प्रेसच्या मोटरमनने तातडीचा ब्रेक लावला. त्यामुळे या गाडीचे तीन डबे बाजूला कलंडले. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर मध्य रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रेल्वेसेवा पूर्ववत होण्यास विलंब लागणार असल्याने काहींनी खासगी वाहनांचा आधार घेत घर गाठले. तर अनेकांना चार ते पाच तासांहून अधिक काळ रखडावे लागले. सर्व स्थानकांवर तुफान गर्दीच गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना एक्प्रेस रेल्वे म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करण्यास रेल्वेने तात्पुरती परवानगी दिली होती. याचा फायदा घेत प्रवाशांनी घर गाठले. मात्र प्रवाशांना काही तास तुफान गर्दीत ताटकळ राहावे लागले. दुस-या दिवशी शनिवारीही रेल्वेसेवा उशिराने धावत होत्या. फास्टट्रॅकवर मोठा फटका बसल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. बससेवा, रिक्षा, टॅक्सीला गर्दी झाल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. अनेकांना दोन ते तीन तास प्रवासात ताटकळत राहावे लागले. रेल्वेसेवा शनिवारी दुपारी सव्वा एक वाजता पूर्ववत झाली. रेल्वेसेवा पूर्ववत झाली, मात्र तरीही रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. तब्बल १५ तासानंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom