Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

इंधन दरवाढीवरून स्मृती इराणीना काँग्रेसच्या महिला नेत्याने विमानातच घेरलं !!


मुंबई - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात सातत्याने वाढ होतेय. याचा परिणाम खाद्यपदार्थां सह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरही झाला आहे. त्यामुळे लोकांना सध्या कोणत्याही वस्तू खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागत आहे. याबाबत विरोधकांकडून सातत्याने सरकारला घेरले जातंय दरम्यान काँग्रेसच्या महिला नेत्या नेट्टा डिसूझा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना इंधन दरवाढीच्या प्रश्नावरुन विमानातच घेरल. यामुळे स्मृती इराणीची मात्र अडचण झाल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओतून पाहायला मिळाले. (Smriti Irani was surrounded by a woman Congress leader on a plane due to fuel price hike)

नेट्टा डिसूझा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तेलाच्या वाढत्या किमती बाबत प्रश्न विचारले. ही संपूर्ण घटना दिल्ली गुवाहाटी फ्लाइट च्या प्रवासादरम्यान घडले. यावेळी डिसूझा यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून तो स्मृती इराणी यांनादखील बॅग करत ट्विट केला. या व्हिडिओमध्ये त्या आपल्या मोबाईल वरुन संपूर्ण संभाषण रेकॉर्ड करताना दिसत आहे. जेव्हा मी त्यांना एलपीजीच्या वाढणाऱ्या किमती बद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मला लसीकरण, राशन आणि गरिबांना केलेल्या मदतीबद्दल माहिती दिली. असही डिसुजा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही माझा रस्ता अडवत असल्याचं स्मृती इराणी  डिसूजा यांच्याशी बोलण्याचा टाळत असल्याचेही व्हिडीओज दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom