सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी भाजपाच - नाना पटोले

Anonymous
0

कोल्हापूर - राज्यातले वीज संकट, शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला, भाजपा नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप अशा अनेक विषयांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी हे भाजपाचेच पंतप्रधान आहेत, देशाचे नाहीत, अशी टीकाही केली. तसेच सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी भाजपाच आहे, असे विधानही त्यांनी केले आहे.

कोल्हापूर : राज्यातले वीज संकट, शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला, भाजपा नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप अशा अनेक विषयांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी हे भाजपाचेच पंतप्रधान आहेत, देशाचे नाहीत, अशी टीकाही केली. तसेच सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी भाजपाच आहे, असे विधानही त्यांनी केले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्रातले भाजपाचे सरकार सत्तेचा दुरुपयोग करून त्यांचा वापर करत आहे. त्यातले आज ना उद्या खरे जनतेसमोर येणारच आहे. भ्रष्टाचारी तर सगळ्यात जास्त भाजपाच आहे. आता भगवान श्रीरामाच्या नावाने पैसे गोळा केले, त्याचा हिशेब देणार नाहीत, आयएनएस विक्रांतच्या नावाने पैसे गोळा केले, किरीट सोमय्यांचे त्यावेळचे ट्वीट आहे, आता ते म्हणतात की आम्ही पैसे गोळा केलेच नाहीत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)