महिलांना व्हिडिओ कॉल करून सतावणाऱ्या बदलापूरातील दुकानदाराला चोपले

0


बदलापूर - आपल्या दुकानात आलेल्या महिलांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना व्हिडिओ कॉल करून सतावणाऱ्या एका दुकानदाराला बदलापूरमधील महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. पुष्पराज परिहार असे या दुकानदाराचे नाव असून त्याचे अनामिका नोवेल्टी नावाचं स्टेशनरी शॉप आहे. या प्रकरणी पुष्पराज याच्याविरोधात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

बदलापूरच्या पश्चिम भागातील आशीर्वाद हॉस्पिटल समोर अनामिका नोवेल्टी नावाचं स्टेशनरी शॉप आहे. या दुकानात आलेल्या महिलांकडून दुकानदार पुष्पराज परिहार हा त्यांचे नंबर कोणत्याही कारणाने मिळवायचा. ते नंबर सेव्ह करून ठेवायचा. त्यानंतर या महिलांना व्हिडिओ कॉल करून पुष्पराज त्रास द्यायचा अशा काही तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे स्थानिक महिलांनी रविवारी संध्याकाळी पुष्पराज याला दुकानात जाऊन चोप दिला, तसंच माफी मागायला भाग पाडलं. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी पुष्पराज याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)