Corona - पुण्यात आढळले नव्या बी ए व्हेरियंटचे ७ रुग्ण

0

पुणे - बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्या समन्वयाने सुरु असणा - या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरात बी. ए. ४ व्हेरियंटचे ४ तर बी.ए. ५ व्हेरियंटचे ३ असे एकूण ७ रुग्ण आढळून आले आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे व्हेरियंट आढळले असून इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर (आय बी डी सी) फरिदाबाद या संस्थेने याची पुष्टी केली आहे. 

हे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहेत आणि ४ मे ते १८ मे २०२२ या कालावधीतील आहेत. यातील ४ पुरुष तर ३ महिला आहेत. यातील ४ जण ५० वर्षांवरील आहेत तर २ जण २० ते ४० वर्षे या वयोगटातील आहेत तर एकजण १० वर्षांखालील आहे. यातील दोन रुग्णांचा दक्षिण आफ्रिका, बेल्जियम प्रवासाचा इतिहास आहे तर तर ३ जणांनी भारतात केरळ आणि कर्नाटक राज्यात प्रवास केला आहे. दोन रुग्णांचा कोणताही प्रवासाचा इतिहास नाही. यातील ९ वर्षाचा एक मुलगा वगळता सर्वानी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तर एकाने बूस्टर देखील घेतलेला आहे. यातील सर्वांना कोविडची सौम्य लक्षणे होती. कोणालाही रुग्णालयात भरती करण्याची गरज भासलेली नाही. प्रत्येकाला घरगुती विलगीकरणात उपचार देण्यात आले. आता हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. बी. ए. ४ आणि ५ हे ओमायक्रॉन वंशावळीतील असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग काहीसा वाढतो असे आंतरराष्ट्रीय अनुभवावरुन लक्षात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)