मुंबईत कोरोना वाढतोय - दिवसभरात ३५२ नवीन रुग्ण

0

मुंबई - मुंबईत मागील दोन - तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून साडेतीनशेच्यावर रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ३५२ रुग्ण आढळले. गेल्या सोमवारी १५० रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी ही संख्या पुन्हा वाढून २१८ वर गेली. त्यानंतर आता ही आकडेवारी साडेतीनशेवर पोहचवली आहे. दिवसभरात २१३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईत १५० च्या आत स्थिर राहिलेली कोरोना रुग्णसंख्या मागील दोन - तीन दिवसांपासून वाढता दिसते आहे. बुधवारी ही रुग्णसंख्या २९५ वर गेली होती. गुरुवारी ३५० रुग्णांची नोंद झाली. तर शुक्रवारी ही संख्या ३५२ वर पोहचली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाख ६४ हजार २७३ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ५६६ वर स्थिर आहे. तर दिवसभरात २१३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना  डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत १ लाख ४२ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३३९६ दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या १,७९७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)