
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी कोविड संसर्ग कालावधीमध्ये केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोविड नियंत्रणात आणण्यास यश आले. ही यशोगाथा सुप्रसिद्ध लेखक मिनाझ मर्चंट यांनी इकबाल सिंह चहल - कोविड वॉरियर या पुस्तकरूपात शब्दबद्ध केली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन उद्या सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृहात होणार आहे. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोरोनाच्या काळात विविध उपाययोजना कोरोनावर वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी "मुंबई मॉडेल"च्या रूपाने फक्त देशातच नव्हे तर जगात नावाजल्या गेल्या. डॉ. चहल यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली मुंबईसारख्या दाट घनता असलेल्या लोकसंख्येच्या महानगरात कोविड-१९ संसर्ग नियंत्रणात आणण्यात यश आले. ही यशोगाथा सुप्रसिद्ध लेखक मिनाझ मर्चंट यांनी इकबाल सिंह चहल - कोविड वॉरियर या पुस्तकरूपात शब्दबद्ध केली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच इतर मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.