शारीरिक संबंध ठेवताना 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

JPN NEWS
0


मुंबई - कुर्ल्यातील हॉटेलमध्ये महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवताना एका 60 वर्षीय व्यक्तीचा ( Old man died during sex in Kurla, Mumbai ) मृत्यू झाल्याची घटना काल 23 मे, सोमवारी रोजी घडली. शारीरिक संबंध ठेवताना बेशुद्ध पडल्यानंतर व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी या मृत घोषित करण्यात आले.

60 वर्षीय व्यक्ती आणि 40 वर्षीय महिला काल सकाळी दहाच्या सुमारास कुर्ल्यातील हॉटेलमध्ये आले. हॉटेलकडून रूम देण्यात आल्यानंतर ते रूममध्ये गेले त्यानंतर काही वेळाने रूममधून माझे प्रियकर बेशुद्ध पडले आहेत, असा फोन आला. त्यानंतर हॉटेलचे कर्मचारी रूममध्ये गेले असता त्यांना व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसली. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी ताबडतोब स्थानिक कुर्ला पोलिसांना याची माहिती दिली. वृद्ध व्यक्तीला सायन येथील नागरी रुग्णालयाला नेण्यात आले, जेथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

त्यानंतर कुर्ला पोलिसांकडून महिलेला पोलीस स्टेशनला नेण्यात आले. चौकशी दरम्यान मृत माणूस वरळी येथील रहिवासी आहे आणि एका खासगी कंपनीत काम करतो. शारीरिक संबंधादरम्यान त्याने दारू पिण्याचा प्रयत्न केला, परंतु बेशुद्ध पडला, असे महिलेने पोलिसांना जबाबात सांगितले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. कुर्ला पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आणि शारीरिक संबंध करण्यापूर्वी त्याने कोणती टॅब्लेट घेतली होती की नाही, हे शोधण्यासाठी ते वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत. अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !