
दिल्ली - जर तुम्हाला नवीन सिम कार्ड (Simcard) घ्यायचे असेल तर भविष्यात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे, कारण सरकारने नवीन सिम घेण्यासाठी नियम बदलले (Rules Change) आहेत. नवीन नियमानुसार, काही ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही, परंतु नवीन वापरकर्त्यांसाठी काही अडचण येऊ शकते. नवीन वापरकर्त्यांना सिम घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल, त्यानंतर सिम कार्ड घरी पोहोचेल. सिमकार्डचा गैरवापर रोखण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
त्यांना सिम मिळणार नाही -
नवीन नियमानुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिमकार्ड मिळणार नाही. टेलिकॉम कंपन्या अशा ग्राहकांना सिम विकू शकणार नाहीत. तर 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ग्राहक आधार किंवा डिजिलॉकरमध्ये साठवलेल्या कोणत्याही कागदपत्रांसह स्वतःची पडताळणी करू शकतात.
केवायसी करावे लागेल
नवीन सिम घेतलेल्या ग्राहकांना (नवीन मोबाईल वापरकर्ते) आधार बेस UIDAI वर ई-केवायसी करावे लागेल. सेवा प्रमाणपत्रासाठी 1 रुपया कंपनीला द्यावा लागणार आहे. 15 सप्टेंबर रोजी कॅबिनेटने मंजूर केलेल्या दूरसंचार सुधारणा अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे.
कंपन्यांवर कारवाई केली जाईल -
टेलिकॉम रिफॉर्म अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांनुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या वापरकर्त्यांना सिम कार्ड मिळणार नाही. मानसिक आजारी व्यक्तीलाही सिमकार्ड दिले जाणार नाही. अशी व्यक्ती सिमकार्ड वापरताना पकडली गेल्यास सिमकार्ड विकणाऱ्या कंपनीला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई केली जाईल.