आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या आधारे करणार क्षयरोगाचे निदान

Anonymous
0

मुंबई  - क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची बाधा होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारद्वारे 'शस्त्र' हे भ्रमणध्वनी आधारित 'अँड्रॉइड ॲप' केंद्र तयार करण्यात आले आहे. या  'ॲपद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांचा आवाज व खोकण्याचे 'रेकॉर्डिंग" केले  जाते. 'रेकॉर्ड' करण्यात आलेल्या या आवाजाचे व खोकण्याचे विश्लेषण हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' आधारित अत्याधुनिक प्रणालींच्या आधारे करण्यात येते. त्यानुसार क्षयरोग बाधा झाल्याचे प्राथमिक स्तरावरील निदान‌ होते. या विश्लेषणाच्या आधारे ज्यांना क्षयरोग बाधा झाल्याचे प्राथमिक निदान झाले आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५६४ कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून यापैकी सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांनी या अँड्रॉइड ॲप आधारित प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. सध्या या प्रक्रियेत केवळ क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असून पुढील टप्प्यात आरोग्य खात्यातील इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश या आधारित चाचणी मध्ये करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या अत्याधुनिक अँड्रॉइड ॲपमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयात न जाता देखील क्षयरोग विषय प्राथमिक चाचणी घरबसल्या करता येणार आहे. या चाचणीमुळे लवकर निदान झाल्याने लवकर उपचार करणे शक्य होणार आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)