गौतम बुद्धांची नीतीसूत्रे अंगिकारली तर जगाचे कल्याण - मुख्यमंत्री

0


मुंबई दि. 16: तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतीसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या अनेक सामाजिक समस्यांतून बाहेर यायचे असेल तर गौतम बुद्धांची विचारसरणी मार्गदर्शक आहे. मनुष्यजातीच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेली नीतीसूत्रे संपूर्ण विश्वाचे कल्याण करतील. आपल्यातील भेदाभेद, विषमता नष्ट करणारा समतेचा त्यांचा उपदेश आपण स्वीकारून वाटचाल केली तर तीच खरी मानवता असेल. आज समाजात हिंसाचार, विकृती, युद्घजन्य स्थिती वाढली आहे. या विकारांवर गौतम बुद्धांचा क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश आपणा सर्वांना मार्ग दाखवणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)