मुंबईत १ जूनपासून शिवयोग केंद्र होणार सुरु

0

मुंबई - आजार झाल्यानंतर उपचारात्मक उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे आवश्यक झाले आहे. यासाठी मुंबई महापालिकेतर्फे येत्या १ जून पासून शिवयोग केंद्रे सुरु केली जाणार आहेत. ही योग केंद्रे सार्वजनिक सभागृहे, महापालिका, किंवा खासगी शाळा, सभागृहे, मंगल कार्यालये सोसायट्यांच्या जागेत आदी ठिकाणी चालवली जाणार आहेत. यासाठी प्रशिक्षकांचे पॅनल तयार करण्यात येणार असून योग प्रशिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. ३० जणांच्या ग्रुप तयार केला जाणार आहे. संस्थांसाठी पालिकेने निविदा मागवल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली.

सध्याच्या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होतो आहे. त्यामुळे योगाला महत्व आले आहे. मुंबई सारख्या धकाधकीच्या स्थितीत अनेकांकडे वेळ नसतो, शिवाय योगाचे महत्वही अनेकांना माहिती नसते. त्यामुळे मुंबई महापालिकेने शिवयोग केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्डात जेथे जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी ही केंद्रे सुरु केली जाणार आहेत. यासाठी ३० ग्रुप तयार केला जाणार आहे. सकाळी ६ ते ८ या वेळांत दोनतास हा योगा असेल. योगा शिक्षकासाठी दोन तासासाठी एक हजार रुपये दिले जाणार आहेत. नामांकित योगा चालवणा-या संस्थांचे पॅनल तयार केले जाणार असून त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. येत्या १ जूनपासून ही केंद्रे सुरु केली जाणार असल्याचे संजीव कुमार यांनी सांगितले. एकूण २०० शिव योग केंद्रे स्थापन करण्यात येणार असून या आर्थिक वर्षासाठी २५ कोटी भांडवली व ५ कोटी महसूली तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)