गाढवाने लाथ मारायच्या आधी आम्हीच लाथ मारून घालवले

JPN NEWS
0


मुंबई :- शेवटी गाढव ते गाढव. घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत जी गाढवं होती त्या गाढवांनी आम्हाला लाथ मारायच्या आधी आम्ही त्यांना लाथ मारुन बाहेर पडलो आहोत, या शब्दात शिवनेचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘गधाधारी’ या टीकेला उत्तर दिले. शिवसेनेचे हिंदुत्व हे ‘गधाधारी’ असल्याची टीका काही दिवसांपूर्वी केली होती.

आज (शनिवारी) सायंकाळी एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. भाजपावर टीका करताना ते म्हणालेत की, हिंदुत्वाचा खोटा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता. हिंदुत्व कसे आहे हे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवले “मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर तो अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे.” हाच धागा घेऊन आपण पुढे जात आहोत. आमचे हिंदुत्व गदाधारी आहे. बाकीच्यांचे घंटाधारी आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !