मुंबईत १४५ ठिकाणी ओव्हरहेड केबल्स धोकादायक स्थितीत

JPN NEWS
0

मुंबई  -  मुंबई शहरात १४५ ठिकाणी ओव्हरहेड वायर्स आणि केबल्स धोकादायक स्थितीत असून त्या काढून टाकण्यात मुंबई महापालिकेला अपयश आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने पत्रकार परिषदेत केला आहे. "स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई" ची अवस्था बकाल मुंबई झाली असल्याची टीकाही आम आदमी पार्टीच्या नेत्या ॲड. सुमित्रा श्रीवास्तव यांनी केली.

मुंबई शहरात मोकळ्या केबल वायर संदर्भात आम आदमी पार्टीने मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांच्या अध्यक्षतेखाली आम आदमी पार्टीच्या नेत्याच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील फोर्ट कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शहरातील १४५  ठिकाणी ओव्हरहेड केबल्स अजूनही कशा धोकादायक स्थितीत आहेत, याबाबतची माहिती त्यांनी मांडली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात सर्वेक्षण करून याबाबतचे वास्तव समोर आणले असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात अजूनही ठीकठिकाणी मोकळ्या केबल वायर लटकलेल्या आहेत. अनेक भागात मोकळ्या ओव्हरहेड वायरला परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्या धोकादायक स्थितीत असताना त्या त्वरीत काढून टाकण्याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसते आहे. संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याची कोणतीही यंत्रणा नाही आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

२०१२ मध्ये  वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका २७ वर्षांच्या दुचाकीस्वाराला ओव्हरहेड मेटल केबल तुटून त्याचा गळा चिरून आपला जीव गमवावा लागला होता. २०१९ मध्ये महालक्ष्मी आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान पश्चिम मार्गावरील ओव्हर हेड इक्विपमेंटवर केबल पडल्याची घटना घडली होती.

महानगरपालिका पुन्हा त्याची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहते आहे का? असा प्रश्न आपचे नेते गोपाल झवेरी यांनी उपस्थित केला. मुंबई महानगरपालिकेने मोकळ्या केबल वायरवर तात्काळ कारवाई करावी आणि ओव्हरहेड वायर्स आणि केबल्स काढून टाकावीत अशी मागणीही आपने केली आहे. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !