दहिसर - पोहायला गेलेले २ तरुण बुडाले, एकाचा मृत्यू

0

मुंबई - मुंबईतील (Mumbai) दहिसर (Dahisar) येथील खदान तलावात पोहायला गेलेले २ तरुण बुडाले (Drowning) आहेत. त्यापैकी १ मुलाचा मृतदेह (Dead body) आढळून आला असून 
मुंबई अग्निशमन दलाकडून (Mumbai Fire Brigade) दुसऱ्या मुलाचा शोध घेतला जात आहे. 

आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ७ तरुण दहिसर पोलीस ठाणे हद्दित खदान तलाव येथे पोहायला गेले होते. बोरवली पश्चिम येथील हे तरुण होते. पोहताना २ जण तलावात बुडाले. सोबतचे तरुण बुडाल्याचे पाहून इतर ५ जण कसेबसे पाण्यातून बाहेर आले. बुडालेल्या २ जणांचा अग्निशमन दलाकडून शोध घेतला जात असताना एकाचा शोध लागला. त्याला शताब्दी रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शेखर विश्वकर्मा (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. तर दुसऱ्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बाकी पाच युवक सुखरूप आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)