मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

Anonymous
0

मुंबई - मुंबईत दोनशे ते अडीचशेच्या खाली आलेल्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली आहे. मागील चार दिवसांपासून सलग चारशे ते साडेचारशेवर रुग्णसंख्या नोंद होते आहे. शनिवारी दिवसभरात ४८६ नवीन रुग्ण आढळले. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण ९५४१ चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

मुंबईत मागील दीड, दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. रोज दोनशे ते अडीचशेच्या आत रुग्णांची नोंद होत होती. यातील रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे कोरोना रुग्ण आटोक्यात आल्याचे समाधानकारक चित्र असताना मागील चार दिवसांपासून रुग्णांची संख्या चारशे ते साडेचारशेवर नोंद होते आहे. त्यामुळे आटोक्यात आलेली रुग्णसंख्या काहीशी वाढताना दिसते आहे. दिवसभरात २८४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ११ लाख ४ हजार ८३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्केवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २३२९ दिवसांवर पोहचला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)