डोलो ६५० साठी डॉक्टरांना १००० कोटींची लाच

Anonymous
0


नवी दिल्ली - कोरोना महामारीमध्ये डॉक्टर कोरोना रुग्णांना अथवा कोरोनाची लक्षणे असणा-यांना प्राथमिक उपचार म्हणून डोलो ६५० गोळी देत होते. अल्पवधीतच या गोळीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. कोरोना काळात ताप आलेल्या अथवा कोरोना रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवर प्रत्येक डॉक्टर डोलो ६५० हे नाव लिहित होते. पण आता यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. गोळ्यांची विक्री वाढविण्यासाठी डोलो ६५० गोळी तयार करणा-या कंपनीने देशभरातील डॉक्टरांना १००० कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याचे समोर आले आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

डोलो ६५० गोळी तयार करणा-या कंपनीचे नाव मायक्रो लॅब्स लिमिडेट आहे. आयकर विभागाने गेल्या महिन्यात ९ राज्यातील कंपनीच्या ३६ ठिकाणी छापेमारी केली. गोळ्यांची विक्री वाढविण्यासाठी डॉक्टरांना १००० कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा आरोप कंपनीवर लावण्यात आला आहे. पण प्रश्न हा आहे की डोलो ६५० च का? ६५० एमजीच्या टॅबलेटमध्ये असे काय आहे?

६५० एमजीच्या पाठीमागील गुपीत काय?
५०० मिलीग्राम पॅरासिटामॉल गोळ्यांची किंमत सरकारकडून ठरवली जाते. त्यापेक्षा जास्त मिलीग्रामच्या गोळ्यांची किंमत फार्मा कंपनी ठरवते. म्हणूनच ५०० एमजीपेक्षा जास्त मिलीग्रामच्या गोळ्यांच्या किंमत जास्त असते. मायक्रो लॅब्स कंपनीही डोलो ६५० चे प्रमोशन करत नफा कमवत आहे.

न्यायाधीशांनाही डोलो ६५० दिली -
गुरुवारी सुप्रीम कोर्टात डोलो ६५० गोळीची चर्चा झाली. सुप्रीम कोर्टात डोलो ६५० कंपनीविरोधात एक जनहितयाचिका दाखल करण्यात आली होती. गोळ्यांची विक्री वाढविण्यासाठी डॉक्टरांना भेटवस्तू दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चंद्रचूड यांनीही याची गंभीर दखल घेतली. त्यासोबतच यावेळी ते म्हणाले की, कोरोना काळात ही गोळी घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिला होता.

विक्री वाढविण्यासाठी डॉक्टरांना भेट -
डोलो ६५० गोळ्यांची विक्री वाढण्यासाठी कंपनीने डॉक्टरांना १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गिफ्ट दिल्याचा दावा याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात केला. कोरोना रुग्णाच्या प्रिस्क्रिप्शनवर डोलो ६५० या गोळीचे नाव लिहिण्यासाठी कंपनीने देशभरातील डॉक्टरांना १,००० कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याचा दावा केला आहे. फेडरेशन ऑफ मेडिकल अ‍ॅण्ड सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह असोसिएशनकडून वकील सजंय पारिख यांनी कोर्टात बाजू मांडली.

न्यायालयाने केंद्राकडे उत्तर मागितले -
डोलो ६५० संदर्भातील याचिकेबाबत केंद्र सरकारकडून अरॠ चे एम नटराज यांनी बाजू मांडली. या याचिकेची गंभीर दखल घेत कोर्टानं केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे. आठवडाभरात केंद्र सरकारला याबाबत उत्तर मागितले आहे. दहा दिवसानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)