गणेशोत्सव - ३२५५ पैकी १९४७ मंडळांना परवानगी

Anonymous
0


मुंबई - अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी आतापर्यंत एकूण ३२५५ मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले असून यातील १९४७ मंडळांना पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. तर विविध कारणाने ४२५ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तसेच परवानगीच्या प्रक्रियेत २७३२ अर्ज असून या अर्जांनाही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता असल्यास ऑगस्ट अखेरपर्यंत रीतसर परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त शरद काळे यांनी दिली.

कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष उत्सवावर निर्बंध होते. हे निर्बंध हटवल्याने यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. सार्वजनिक मंडळांकडूनही उत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मंडळांकडून मंडपासह इतर गोष्टींसाठी प्रशासनाकडून परवानगी घेतली जाते आहे. मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांना दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी वाहतूक पोलीस, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस ठाण्यांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र गणेश मंडळांची गैरसोय दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध प्राधिकरणाच्या परवानगी एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू केली आहे.

आतापर्यंतची स्थिती -
- परवानगीसाठी आलेले अर्ज - ३२५५
- परवानगी मिळालेली मंडळे - १९४७
- दुबार आलेले अर्ज - ५२३
- प्रक्रियेत असणारे अर्ज - २७३२
- परवानगी नाकारली - ४१५
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)