हिंदू महिलांसमवेत मंगलप्रभात लोढा यांचे रक्षाबंधन

0

मुंबई - मुंबई भाजपा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी मालाड मालवणी परिसरातील हिंदु दलित महिलांसमवेत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. मोठ्या संख्येने उपस्थित राहत महिलांनी राखी बांधून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे औक्षण केले. सुमारे चारशेहून अधिक महिलांनी मंत्री लोढा यांना राखी बांधली.

मंगलप्रभात लोढा यांना राखी बांधण्यासाठी सकाळपासून मोठ्या संख्येने महिलांनी गर्दी केली होती. हा भावनिक क्षण अनुभवण्यासाठी अनेकजण कुटुंबासहित उपस्थित होते. यावेळी मायेची भेट म्हणून महिलांना ओवाळणी देण्यात आली. मालवणी येथील शेकडो हिंदु परिवारांना धर्मांधांच्या दहशतीमुळे परिसर सोडावा लागला होता. याविरोधात वेळोवेळी आवाज उठवत मंत्री. मंगलप्रभात लोढा यांनी स्थानिकांना न्याय देण्यासाठी लढा दिला आहे. त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी धर्मांध प्रवृत्तीच्या विरोधात विधानसभेत आवाज उठविला होता. या पार्श्वभूमीवर लोढा यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मालवणी परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

'आता हिंदूंना न्याय मिळेल' अशी अपेक्षा अनेक महिलांनी व्यक्त केली. मालवणी परिसर सोडून गेलेल्या हिंदूंचे पुनर्वसन हीच खरी रक्षाबंधनाची ओवाळणी ठरेल अशी अपेक्षा महिलांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे व्यक्त केली. मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, भाजयुमो अध्यक्ष तजिंदर तिवाना, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर उपस्थित होते.

إرسال تعليق

0تعليقات
إرسال تعليق (0)