डिजिटल तिकीट प्रणाली, इलेक्ट्रीक बस सेवेची अफ्रिकन देशाला आकर्षण

0

मुंबई - बेस्ट उपक्रमाने डिजिटल युगात पाऊल टाकले असून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या डिजिटल तिकीट प्रणाली व इलेक्ट्रीक बस सेवेची अफ्रिकन देशाला भुरळ पडली आहे. अफ्रिकन शिष्टमंडळाने बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील बेस्ट भवनास भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली. बेस्ट उपक्रमाच्या डिजिटल सेवेचा अभ्यास करण्यासाठी ही भेट घेतल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.

इलेक्ट्रिक दळणवळणाबाबत माहितीपूर्ण अभ्यास करण्याच्या उद्देशाने अफिक्रेतील सहा नगर प्रशासनांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी बेस्टच्या इलेक्ट्रिक बस प्रवर्तन आणि डिजिटल तिकीट प्रणालीचा सखोल अभ्यास करण्यासाठी भेट दिली. सदर उपक्रमाची अंमलबजावणी अफ्रिकेतील सहा महापालिकांमध्ये करण्याचा त्यांचा विचार आहे. या शिष्टमंडळामध्ये केनिया, युगांडा, दक्षिण अफ्रिका, रवांडा सेचिलीस आणि कोटडिल्वोयर येथील वरिष्ठ अधिका-यांचा समावेश आहे.

बेस्ट उपक्रमातील बसेसचा ताफा वाढीबरोबर प्रवाशांना सार्वजनिक सेवेकडे आकर्षित करण्यासाठी तसेच बेस्ट उपक्रमाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. इलेक्ट्रिक बस, डिजिटल तिकीट प्रणाली, एनसीएमसी कार्ड टॅप इन टॅप आऊट सेवा इंटेलिजट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम, मोबाईल अँप , हेरीटेज बससेवा आणि महिला विशेष सेवा अशा विविध उपक्रमांचा लाभ प्रवाशांना होत आहे. बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची दखल दिल्ली परिवहन मंडळ, तेलंगणा राज्य मार्ग परिवहन मंडल, केरळ राज्य मार्ग परिवहन मंडळाने घेतली आहे. विशेष म्हणजे राज्य मार्ग परिवहन उपक्रमांचे अधिकारी देखील बेस्ट उपक्रमाला भेट देऊन सदर उपक्रम आणि योजनांचा अभ्यास करीत आहेत. भविष्यात त्यांची अंमलबजावणी त्यांच्या संस्थांमधून करणे शक्य होईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्ली राज्याचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी देखील बेस्ट उपक्रमाला भेट देत बेस्टच्या विविध योजनांची माहिती घेतली होती.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)