लालबागच्या राजा मंडळाला ३ लाख ६६ हजाराचा दंड

Anonymous
0


मुंबई - लालबागचा राजा मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवात दर्शनाच्या रांगांसाठी बॅरिकेड्स लावताना रस्त्यावर अनधिकृतपणे खड्डे पाडल्यामुळे पालिकेच्या ‘ई’ वॉर्डने मंडळाला ३ लाख ६६ हजारांचा दंड भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. मंडळाने पदपथ, रस्त्यांवर १८३ खड्डे अनधिकृतपणे पाडले असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.

गणेशोत्सव काळात बॅरिकेड्स लावताना ‘ई’ विभागाच्या हद्दीमधील टी.बी. कदम मार्गावर (दत्ताराम लाड मार्ग जंक्शन ते नेकजात मराठा बिल्डिंगपर्यंत) पालिकेची कोणतीही परवानगी न घेता मंडळाकडून खड्डे पाडण्यात आले आहेत. यामध्ये फुटपाथवर ५३ तर रस्त्यावर १५० असे एकूण १८३ खड्डे पाडल्याचे पालिकेच्या तपासणीत समोर आले आहे. यामध्ये पालिकेच्या नियमानुसार प्रतिखड्डा २ हजार या प्रमाणे मंडळाला ३ लाख ६६ हजार रुपये दंड केला आहे. मंडळाने ही रक्कम ‘ई’ वॉर्ड कार्यालयात तातडीने भरावी असे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. याबाबत महेश वेंगुर्लेकर यांनी ‘ई’ विभागाकडे २०२२ च्या गणेशोत्सवात लालबागचा राजा मंडळाने अनधिकृपणे पाडलेल्या खड्ड्यांची स्थिती आणि दंडाची माहिती अधिकारात मागितली होती. याला पालिकेने उत्तर देताना ही माहिती दिली आहे.


Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)