खड्डे बुजवण्यासाठी विभागवार पाच लाखाचा निधीचा निधी

0

मुंबई - मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांविषयी पालिकेला मुंबईकरांच्या टीकेला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे प्रशासनाने खड्डेमुक्तीकडे अधिक भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयांना कोल्डमिक्स खरेदीसाठी ५ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्डमिक्सने खड्डे भरण्यासाठी मुंबई पालिकेच्या २४ विभागांनी बाजारातून कोल्डमिक्स विकत घेण्यासाठी ५ लाखाचा निधी दिला जात आहे. यापूर्वीं पालिकेने सर्वच विभागाना प्रत्येक पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्तीसाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्या निधीत आणखी ५० लाख रुपयाचा निधी दिला गेला आहे. पालिकेकडे खड्ड्याविषयी तक्रार येताच ती तक्रार ४८ तासात दूर करण्याचे आदेश प्रत्येक विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यासाठी आता पुरविण्यात येणाऱ्या पाच लाख रुपयांचा निधी वापरुन बाजारात उपलब्ध असणाऱ्या कोल्डमिक्सचा वापर खड्डे बुजविण्यासाठी केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील अद्याप खड्ड्यांची तक्रार दूर झालेली नाही. अनेक ठिकाणी खड्डेमय रस्त्यावरून मुंबईकरांना प्रवास करावा लागतो आहे. ऐन गणेशोत्सवातही रस्त्यावरील खड्डयांनी मुंबईकर त्रासले होते. आता, नवरात्रोत्सव जवळ आली असताना रस्ते खड्डेमुक्त असावेत, अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे. त्याअनुषंगाने पालिकेने २४ विभाग कार्यालयाना दिलेल्या अतिरिक्त पाच लाख रुपयांचा निधी खड्डे बुजवण्यासाठी उपयुक्त वापरला जाणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)