Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अंधेरी पोटनिवडणुक - लटके आणि पटेल यांच्यामध्ये "सामना"


मुंबई - अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri by Elelctions) जागेसाठी (१४ ऑक्टोबर) आतापर्यंत पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. महाविकास आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे ऋतुजा लटके (Shivsena Rutuja Latake), भाजपकडून मुरजी पटेल (Bjp Murji Patel) तर दोन अपक्ष आणि क्रांतिकारी जय हिंद सेनेच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. पाच जणांनी उमेदवारी अर्ज भरले असले तरी खरी लढत ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यामध्ये होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंच आहे. मतदान ३ नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या ऋतुजा लटके, भाजपकडून मुरजी पटेल, राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे. या मतदारसंघातील शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, मुंबई महापालिकेच्या सेवेच्या राजीनाम्यावरून पेच निर्माण झाला होता. शेवटी तो न्यायालयात गेल्याने भाजप आणि शिंदे गटाने नव्या चाली रचल्या होत्या.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दोन फॉर्म भरण्यात आले आहेत. प्रतिष्ठेच्या बनलेल्या राजकीय लढाईत कोणतीही चूक होऊ नये यासाठी ठाकरे गटाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि भाजपकडून आज शक्तीप्रदर्शन केले गेले. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. १९८५ मध्ये जशी मशाल हाती घेऊन निवडणुकीत विजय मिळवला तसाच विजय या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय होईल. लटके या १०० टक्के भरघोस मतांनी निवडून येतील, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे असेही शिवसैनिकांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom