मुंबईत गोवरचे २८६० संशयित रुग्ण, ९ मृत्यू

0

मुंबई - मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण १७६ रुग्णांची तर २८६० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवंडीमधील एका १० महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा ९ झाला आहे. ९ मृत्यूपैकी एक मृत्यू मुंबई बाहेरील आहे. ४६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १३७ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी ७ रुग्ण ऑक्सीजनवर २ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

१३७ रुग्ण रुग्णालयात, ७ आयसीयुत, २ व्हेंटिलेटवर -
मुंबईत २३ लाख ८७ हजार ३८६ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले २८६० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १७६ रुग्ण आढळून आले आहेत. ० ते ८ महिन्याचे १८, ९ ते ११ महिने ९, १ ते ४ वर्ष ६४, ५ ते ९ वर्षे २८, १० ते १४ वर्षे ९, १५ आणि त्यावरील ९ असे एकूण १३७ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी ७ रुग्ण ऑक्सिजनवर तर २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. ४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १३ हजार ९६२ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

९ संशयीत मृत्यू -
२६ ऑक्टोबर पासून मुंबईत ९ मृत्यू झाले आहेत. त्यामधील एक मृत्यू मुंबई मुंबई बाहेरील (भिवंडी) येथील आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)