Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लोकांनी चैत्यभूमीवर येऊ नये - आनंदराज आंबेडकर


मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाणदिन (Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Day) येत आहे. या दिवशी अशा 'महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लोकांनी चैत्यभूमीवर येऊ (People making controversial statements should not come to Chaityabhoomi) नये. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा (Law and order) प्रश्न निर्माण होऊ शकतो, (latest news from Mumbai) असा इशाराच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी दिला आहे.

सभेसाठी शौचालयाच्या बाजूची जागा -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभरातून त्यांच्या विचारांना मानणारे त्यांचे लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर येत असतात. यात अनेक कार्यक्रम केले जातात. रिपब्लिकन पक्षांच्या छोट्या-छोट्या सभा देखील यावेळी होत असतात. अशातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेतर्फे ६ तारखेला एका छोट्या सभेच आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिसांकडे जागा मागितली होती. महानगरपालिकेने त्यांना सोयीची जागा दिली. मात्र, मुंबई पोलिसांनी एका शौचालयाच्या बाजूची जागा दिली. पोलिसांनी शौचालयाच्या बाजूची जागा दिल्यामुळे आनंदराज आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हा बाबासाहेबांचा अपमान -
यावेळी बोलताना बाबासाहेबांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर म्हणाले की, "६ डिसेंबरला आम्हाला सभा घ्यायची आहे; पण या सभेसाठी पोलिसांकडून आम्हाला शौचालयाच्या बाजूची जागा देण्यात आली आहे. एका महापुरुषाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या सभेसाठी शौचालयाची जागा देणे म्हणजे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. सभेसाठी चांगली जागा द्यावी अशी आमची मागणी असल्याचे आनंदराज आंबेडकर म्हणाले. 

कोणी केली आहेत वादग्रस्त वक्तव्य -
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsing Koshyari) यांच्यापासून सुरू झालेली राज्यातील वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्यापही सुरूच आहे. त्यानंतर भाजपच्या (BJP) अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारी वक्तव्य केली आहेत.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज जुने झाले, आता नितीन गडकरी (Nitin Gadkari) सारख्या नेत्यांचा आदर्श समोर ठेवण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचे वक्तव्य केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom