Mahaparinirvan Day - महापरीनिर्वाणदिनी वह्या पेन पुस्तकांची आदरांजली द्या - आंबेडकर कुटुबियांसह मान्यवरांचे आवाहन

Anonymous
0

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा शैक्षणिक संदेश अंमलात आणण्यासाठी ६ डिसेंबर या त्यांच्या ६६ व्या महापरीनिर्वाणदिनी (Mahaparinirvan Day) वह्या पेन पुस्तकांची आदरांजली द्यावी असे आवाहन आंबेडकर कुटुंबियांसह विविध मान्यवरांनी केले आहे. 
    
महामानवाच्या महापरीनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करताना वह्या पेन पुस्तकांची आदरांजली द्यावी असे आवाहन महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानच्या (one pen one notebook) वतीने करण्यात येते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक संघर्ष शैक्षणिक अर्हता तसेच त्यांनी जनतेला दिलेला शिक्षणाचा संदेश लक्षात घेता  हा संदेश अंमलात आणण्यासाठी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ६ डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी (Chaityabhumi, Dadar) वर येताना वह्या पेन पुस्तकांची व ईतर शैक्षणिक साहित्य घेऊन यावे असे आवाहन बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar) व रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी केले आहे. सदर साहित्याचे संकलन करण्यासाठी चैत्यभूमीशेजारील दिवंगत भैय्यासाहेब आंबेडकर स्मारक तसेच चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळील भागोजी किर  पुतळा येथे संकलन केंद्र असून या ठिकाणी सदर ठीकाणी हे साहित्य जमा करण्यात यावे असे आवाहन  महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानचे अध्यक्ष राजू झनके यांनी केले आहे. 

दरम्यान पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, पहील्या महिला लोकशाहीरा सीमा पाटील, भीम आर्मीचे अशोक कांबळे, सीताराम गंगावणे, कला निर्माता  दिग्दर्शक जाॅली मोरे, आरपीआयचे राजाराम खरात, दिलीप दादा जगताप, कामगार नेते रमेश कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुमेध जाधव, भीमराज की बेटी मै तो जयभीमवाली हू फेम गायिका दीक्षा शिर्के यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील एक वही एक पेन अभियानाला बळकटी देवून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना शैक्षणिक आदरांजली द्यावी असे आवाहन केले आहे. सदर अभियानात सहभाग देण्यासाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर  संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)