Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कर्जाचे हप्ते महागणार, रेपो रेटमध्ये ३५ पॉइंटची वाढ


नवी दिल्ली / मुंबई - तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचे निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केले. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये ३५ पॉइंटची (Repo Rate) वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर आता रेपो दर आता ६.२५ टक्के एवढा झाला आहे. आधी तो ५.९ टक्क्यांवर होता. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता सामान्य लोकांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ झाली आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय एमपीसीची बैठक सोमवारी झाली.

गेल्या आठ महिन्यांमध्ये अंदाजे २.२५ टक्क्यांनी रेपो रेटमध्ये वाढ झाली. याचा अप्रत्यक्ष परिणाम गृहकर्ज आणि बँकांकडून इतर गोष्टींसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जांवरही होऊ शकतो. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाला आरबीआय संबंधित बोर्डाच्या सहापैकी पाच सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. कोविडमध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ न करत आहे तसाच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मे, २०२२ मध्ये आरबीआयने ४० पॉइंटची वाढ केली. त्यानंतर सलग तीन महिन्यात वेळा प्रत्येकी ५० पॉइंटची वाढ करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom