'फी'साठी परिक्षेपासून वंचित ठेवणाऱ्या शारदाश्रम शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल

0

मुंबई - सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यासारखे क्रिकेटर शिकलेल्या दादर येथील शारदाश्रम शाळे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शाळेची फी भरली नाही म्हणून एका विद्यार्थिनीला घटक चाचणी परीक्षेला बसू दिले नसल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. 

मुंबईतील (Mumbai) दादरच्या शारदाश्रम इंटरनॅशनल स्कूलमध्ये (Sharadashram International School) हा प्रकार घडला. ही मुलगी दुसरीच्या वर्गात शिकते. आपल्या मुलीला शाळेची फी भरली नाही म्हणून घटक चाचणी परीक्षेला बसून न देता दुसऱ्या एका रुममध्ये ठेवण्यात आलं. शिवाय त्रास देऊन अपमानित करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनीचे पालक मृगेंद्र राणे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी शाळेच्या विरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये (Dadar Police Station) तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर शारदाश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान विद्यार्थिनीला अपमानित केल्यासंबंधी आरोप शाळेने फेटाळले आहेत. वर्षभरापासून फी न भरल्याने विद्यार्थिनीला चाचणी परीक्षेला बसू दिलं नाही, असं स्पष्टीकरण शाळेने दिलं आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)