जागतिक बँकेने दिला आर्थिक मंदीचा इशारा

Anonymous
0

नवी दिल्ली - जगभरात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदी येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जागतिक बँकेने आर्थिक मंदीचा इशारा दिला आहे. अमेरिका (वर), युरोप आणि चीन या सर्व प्रमुख आणि आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या विकास दरात घट झाल्यामुळे चालू वर्षात जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असणार असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. (world bank warned of a global recession) जगभरातील अनेक वित्तीय संस्थांनीदेखील यंदा मंदीचे सावट असणार असल्याचा इशारा दिला आहे. 

जागतिक आर्थिक मंदी - 
जागतिक बँकेने आपल्या वार्षिक अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक बँकेने २०२३ साठी जागतिक विकास दर १.७ टक्क्यांवर आणला आहे. याआधी हा दर ३ टक्के इतका होता. जागतिक बँकेने मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जागतिक बँकेने वर्तवलेला अंदाज खरा ठरल्यास तीन दशकांत ही तिस-यांदा आर्थिक विकास दर सर्वात कमकुवत असणार असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी २००८ मधील जागतिक आर्थिक मंदी, वर्ष २०२० मध्ये कोरोना महासाथीमुळे जागतिक विकास दरात मोठी घसरण झाली होती. जागतिक बँकेच्या अहवालानुसार अमेरिका या वर्षी मंदी टाळू शकते. पण अमेरिकेचा विकास दर केवळ ०.५ टक्केच राहण्याचा अंदाज आहे.

पाकिस्तान सर्वात मोठ्या संकटात -
इस्लामाबाद  आपल्या शेजारी असणारा पाकिस्तान देश निर्मितीनंतर सर्वात मोठ्या संकटात आहे. कारण पाकिस्तानात ऐतिहासिक महागाई झाली आहे. अर्थव्यवस्था ढासळली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. देशातील सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नोक-या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाकिस्तान यावर कशी मात करणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. बरोबर चार महिन्यांपूर्वी जवळपास ७० टक्के पाकिस्तान पाण्याखाली गेला होता. अनेक गावे अक्षरश: वाहून गेली होती. हजारो एकरवरची शेतीही पाण्यात गेली होती. कोट्यवधी जनतेची घरे जमीनदोस्त झाली होती. इतिहासातील सर्वात मोठे स्थलांतरही झाले होते आणि त्याच महापुराच्या संकटातून बाहेर येण्याआधीच पाकिस्तान आणखी एका महासंकटात अडकलं आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)