Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

विक्रोळीतील शाळेच्या मुख्याध्यापिका, ट्रस्टीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल


मुंबई - आदिवासी शिक्षिकेला आपल्या हक्का पासून दूर ठेवून मुख्याध्यापक पदापासून दूर ठेवण्यात आले तसेच या शिक्षिकेवर जाती वरून अपमानास्पद बोलून वेळोवेळी मानसिक छळ केला. या प्रकरणी आरपीआय (A) कामगारा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात महादेव उपाध्याय माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, माजी मुख्याध्यापक तसेच शिक्षका विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आदिवासी समाजाची शिक्षिका पुष्पा बागुल यांनी सेवाजेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदावर दावेदारी दाखल केल्यामुळे हरियाली व्हिलेज, टागोर नगर, विक्रोळी मुंबई येथील महादेव उपाध्याय माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, ट्रस्टी व शिक्षक यांनी आपसात संगणमत करून पुष्पा बागुल यांची सेवाजेष्ठता नाकारली, इन्क्रिमेंट थांबवली, जाती वरून अपमानास्पद बोलून वेळोवेळी मानसिक छळ केला. नोकरी वरून काढण्याची धमकी दिली व पगार थांबविला अशी लेखी तक्रार आदिवासी समाजाच्या पीडित शिक्षका पुष्पा बागुल यांनी आरपीआय (ए) कामगार आघाडी ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखेडे यांच्याकडे केली. या तक्रारी वरून आर पी आय (A) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या आदेशाने पीडित शिक्षिकेला न्याय  देण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला आरपीआयच्या शिष्टमंडळाने भेट देऊन लेखी तक्रार अर्ज दाखल केला. 

या अर्जावरून विक्रोळी पोलिस ठाणे पोलिसांनी महादेव उपाध्याय माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांचन दुबे, ट्रस्टी गिरीजादेवी उपाध्याय, माजी मुख्याध्यापक अशोक सिंह ,शिक्षक सदाब्रुज सिंह यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक  सुधारित कायदा 2015 (ॲट्रॉसिटी )कलम 3(1 )(आर ), 3(1)(s), भादवि कलम 509 ,504, 506 ,34 प्रमाणे 10 एप्रिल 2023 रोजी विक्रोळी पोलीस ठाणे मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला. 

सदर प्रकरणात रिपब्लिकन पक्ष कामगार आघाडी ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस स्टेशनला भेटी दिल्या यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) कामगार आघाडी ठाणे प्रदेश सचिव कुशल निकाळे, प्रदेश कार्यालय सचिव नितीन उघडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन भालेराव आदींचा शिष्टमंडळात समावेश होता सदर महिलेला न्याय मिळवून दिल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे पीडित आदिवासी महिला शिक्षिका पुष्पा बागुल यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom