Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी पुढील निवडणुका लढणार


छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची वज्रमूठ सभा सुरु असताना मंचावर सगळ्या खुर्चा एक प्रकारच्या असताना त्यातील एक खुर्ची ही विशेष आणि सर्वांचं लक्ष खेचून घेत होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील मंचावर असताना ती खुर्ची मधोमध आणि मोकळी दिसत होती. या सभेसाठी सर्वात शेवटी उद्धव ठाकरे हजर झाले. आणि जल्लोष फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. त्या विशेष खुर्चीवर उद्धव ठाकरे आसनस्थ झाले. यावरुन महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना प्रमुख नेता म्हणून मान्य केले आहे. (Mahavikas Aghadi will contest the next elections under the leadership of Uddhav Thackeray)

छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मविआने अधिक अधोरेखित केल्याचं चित्र पाहायला मिळालं. आजच्या या सभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील असे दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते. त्यावेळी मविआ सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नेता म्हणून प्रत्येकाने त्यांचा भाषणात आदरपूर्वक उल्लेख केला. 

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या कामाचं त्यांच्यापेक्षा अनुभवी असलेल्या मंचावरच्या सर्वच नेत्यांनी कौतुक केलं. इतकंच नव्हे तर त्यांच्यासाठी सर्व नेत्यांपेक्षा वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांची मंचावर सर्वात शेवटी एन्ट्री झाली, तेव्हा आसमंतात फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. एकूणच आजच्या सभेने उद्धव ठाकरेंनाच मविआचा प्रमुख नेता म्हणून प्रोजेक्ट केलं का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom