Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

केंद्र सरकारच्या छापखान्यांतून ८८ हजार कोटींहून अधिक रक्कम गायब


मुंबई - केंद्र सरकारने ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नोटा छापल्या होत्या, पण रिझर्व्ह बँकेकडे फक्त ७,२६० दशलक्ष नोटा पोहोचल्या. 
सुमारे १,५५० दशलक्ष ५०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचल्या नाहीत. अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली आहे. त्यामुळे सरकारी  छापखान्यांतून ८८ हजार कोटींहून अधिक रक्कम गायब झाली का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ दरम्यान, नाशिकच्या करन्सी नोट प्रेसद्वारे ५०० रुपयांच्या २१० दशलक्ष नोटा छापण्यात आल्या, त्या रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचल्या नाहीत. सुमारे १७६० दशलक्ष म्हणजेच १७६ कोटी ५०० रुपयांच्या या सर्व नोटा गायब झाल्या आहेत का? या नोटांची किंमत काढली तर ती सुमारे ८८ हजार कोटी रुपये आहे. फ्री प्रेस जरनलच्या रिपोर्ट्सनुसार, आरटीआयद्वारे कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की करन्सी नोट प्रेस, नाशिकने २०१५ ते मार्च २०१६ दरम्यान ५०० रुपयांच्या सुमारे ३७५.४५० दशलक्ष नोटा छापल्या होत्या. पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नोंदीनुसार फक्त ३४५ दशलक्ष नोटा पोहोचल्याचे दिसून येते.

गेल्या महिन्यात, करन्सी नोट प्रेस, नाशिकने आणखी एका आरटीआयला उत्तर देताना सांगितले होते की, रघुराम राजन गव्हर्नर असताना एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत २१० दशलक्ष रुपयांच्या ५०० नोटा छापून रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आल्या होत्या. करन्सी नोट प्रेस, नाशिकच्या अहवालावरून असे दिसून येते की, सेंट्रल बँकेला ५०० रुपयांच्या नवीन नोटांचा पुरवठा करण्यात आला होता, परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात ५०० रुपयांच्या नव्या नोटा मिळाल्याची माहिती उपलब्ध नाही. २१० दशलक्ष ५०० रुपयांच्या नोटाही रिझर्व्ह बँकेला मिळालेल्या नाहीत. रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र मध्यवर्ती बँकेच्या अधिका-यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

देशात ३ छापखाने -
भारतात ३ सरकारी छापखाने आहेत, जिथे चलनी नोटा छापल्या जातात. पहिली भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेड आहे, जी बंगळुरूमध्ये आहे. दुसरी करन्सी नोट प्रेस, जी नाशिकमध्ये आहे आणि तिसरी बँक नोट प्रेस आहे, जी देवासमध्ये आहे. चलनी नोटा येथे छापल्या जातात आणि नंतर त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठवल्या जातात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom