Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

Crime News : मिरा रोड येथे श्रद्धा वालकर पेक्षा भयंकर हत्याकांड


मिरा रोड - दिल्लीतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणाने देश हादरला होता. ही घटना ताजी असतानाच यापेक्षाही भयंकर घटना मिरा रोड येथे घडली आहे. मिरा रोडमध्ये लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या रुम पार्टनरची निघृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या शरीराचे तुकडे तुकडे कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याची घटना समोर आली आहे. (A repeat of the Shraddha Walkar murder case at Mira Road)

मिळालेल्या माहितीनुसार मनोज साने (56 वर्ष) व सरस्वती वैद्य (32 वर्ष) मीरा भाईंदर येथे उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाच्या सोसायटीत राहतात. हे दोघेही गेले काही वर्ष लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. बाजूच्या रहिवाशांना दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घराची तपासणी केल्यावर मनोज साने याने सरस्वती वैद्य यांचा खून केल्याचे समोर आले. त्याने शरीराचे तुकडे केल्यावर कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये बारीक करून शरीराचे तुकडे पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून दिले. यासाठी तो बाईकचा वापर करत असे. गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक पोलिसांनी जप्त केलं आहे. पोलिसांनी आरोपीली अटक केली आहे. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे देखील त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. (Marathi Batmya)

काय आहे श्रद्धा वालकर प्रकरण -
दिल्लीतील मेहरौली येथील मुंबईतील आफताब पेशाने शेफ आणि फोटोग्राफर होता. त्याने १८ मे रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची गळा आवळून हत्या केली. यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले, ते ठेवण्यासाठी त्याने ३०० लिटरचा फ्रीजही खरेदी केला. पुढे अनेक दिवस तो हळूहळू ते तुकडे जंगलात जाऊन फेकत राहिला. आफताब श्रद्धाचा इतका तिरस्कार करु लागला की, त्याने गांजा पिऊन फक्त तिची हत्याच केली नाही. तर त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि नंतर अशा ठिकाणी फेकून दिली जेथून पोलीस ते परत मिळवू शकणार नाहीत. एवढेच नाही तर यानंतरही त्याचा द्वेष संपला नाही म्हणून त्याने श्रद्धाचे फोटोही जाळून टाकले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom