DATE 23 JUN 20122
मंत्रालयातील आगीमध्ये अग्निशमन दलाची हतबलता
मंत्रालयाला गुरुवारी दुपारी २.४५ वाजता ४ थ्या मजल्यावर आग लागली या आगीमध्ये मंत्रालयाचे ४, ५, ६, ७ अशे चार माजले जळून खाक झाले. मंत्रालय सारख्या अतिमहत्वाच्या इमारतीला आग लागते आणि या इमारतीचा नकाशा नसल्याने व इमारतीची रचना कशी आहे हे अग्निशमन दलाला माहित नसल्याने आग विझवण्यासाठी विझविण्यासाठी तब्बल २० तासांहून अधिक काळ लागला.
अग्निशमन दलाचे मंत्रालयाची आग विझविताना नियोजन कुठे होते ? मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाचा कोणता सहभाग होता ? असे एका ना अनेक नाराजी प्रकट करणारे प्रश्न राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रांनी केले. तसेच मुंबईतील अग्निशमन दल मंत्रालयातील आग विझवताना सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे
मंत्रालयाच्या चौथ्या मजल्याला आग लागली, तेव्हा अग्निशमन दलाची यंत्रणा वेळेवर पोहोचली . मात्र आगविझविण्यासाठी त्यांचे योग्य नियोजन नव्हते. चौथ्या मजल्यावर आग लागली तेव्हा अग्निशमन दलाने पाण्याचे फवारे मारले. परंतु एकाच जागी पाण्याचे फवारे मारले जात होते . आग विझविण्याचे प्रयत्न होत होते. परंतु पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आग पसरू नये, यासाठी आखणी प्रयत्न करण्याची गरज होती . त्यात अग्निशमन दल अपयशी ठरले.
मंत्रालयात आग पसरली तशी त्याचवेगाने मंत्रालयातून सुमारे दीड ते दोन हजार अधिकारी आणि कर्मचारी स्वतःहून बाहेर पडले . त्यासाठी अग्निशमन दलाला कष्ट पडले नाहीत. केवळ ६० जणांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. आगीत पाचजण मृत्युमुखी पडले, परंतु त्यांचा शोध घेण्यातही अग्निशमन दलाला अपयश आले होते.
सकाळी अजितपवार आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव नितीन करीर यांनी मंत्रालयाची पहाणी केली. उपमुख्यमंत्री आपल्या सहाव्यामजल्यावरील दालनाजवळ गेले असताना त्यांना तेथे आणखी एक मृतदेह दिसला. त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना दोन कर्मचाऱ्यांचे मृतदेह दिसले. अग्निशमनदलाच्या जवानांनी शुक्रवारी दुपारी ते दोन मृतदेह बाहेर काढले. गुरुवारी दुपारपासून मुख्यमंत्र्यांचे दोन कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती.
मंत्रालयात राज्य सरकारचा अग्निशमन अधिकारी तैनात असतो. या अधिकाऱ्याला संपूर्ण इमारतीतील अग्निप्रतिबंधक यंत्रणेची माहिती असते. तो घटनास्थळी उपस्थित असता तर आग भडकण्यापूर्वीच आटोक्यात आणणे शक्य झाले असते. मात्र मंत्रालयाला लागलेली आग अटोक्यात आणताना हा अधिकारी कोठेही दिसला नाही. मंत्रालयाचे फायर ऑडिट २००७ साली झाले होते. तेव्हा त्यात अनेक त्रुटी आढळल्या होत्या. मात्र त्यानंतर कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नव्हती. अग्निसुरक्षा अधिकारी असलेल्या इमारतींची तपासणी पालिका करत नाही, असे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख सुहास जोशी यांनी स्पष्ट केले.
अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेले दल म्हणून ओळख असलेल्या मुंबई फायर ब्रिगेडची अकार्यक्षमता आणि हतबलता मंत्रालयातील आगीमुळे समोर आली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अत्याधुनिक फायर इंजिन शोभेच्या बाहुल्या बनून फायरस्टेशन्स मध्ये उभ्या होत्या. त्यामुळेच वेळेत आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य न झाल्याचे सत्य समोर आले आहे.
मंत्रालयाच्या जवळच असलेल्या नरीमन पॉइंट फायर स्टेशनवरील स्नॉर्केल ( उंच शिडी असलेली अत्याधुनिक गाडी ), अॅब्युलन्स कर्मचाऱ्यां अभावी बंद ठेवण्यात आली होती. फायर ब्रिग्रेड मुख्यालयातील तीन स्नॉर्केलची स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. वरळी येथील स्नॉर्केल बंद अवस्थेत आहे. दादर येथील फायर इंजिन ड्रायव्हर अभावी बंद होते . अशा परिस्थितीमुळे पूर्ण ताकदीनिशी वेळेत आगीशी मुकाबला करणे फायर ब्रिगेडला शक्य झालेंले नाही. त्यामुळे उपनगरातील फायर इंजिन्स घटनास्थळी पोहोचे पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
स्वतःकडे अत्याधुनिक यंत्रणा असतानाही अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे मिरा - भाईंदर येथून फायर इंजिन मागवण्याची नामुष्की ब्रिगेडवर आली. कर्मचाऱ्यांना ओटी देण्यापेक्षा फायर इंजिन्स बंद ठेवण्याची पद्धत फायर ब्रिगेड प्रशासनाने स्वीकारली आहे . त्यामुळे अनेक फायर इंजिन्स दिसत असली तरी त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची संख्या मात्र अपुरी आहे. याचाच फटका मंत्रालयाच्या आगी दरम्यान ब्रिगेडला बसल्याचे समोर आले आहे. अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:
Post a Comment