मुंबईमध्ये सागरी वाहतूक
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम सागरी वाहतुकीसाठी मागविण्यात आलेल्या निविदांमधून पूर्व सागरी वाहतूक आणि फेरी सेवेसाठी जे. कुमार आणि फाऊंडेशन असोसिएट्स यांची, तर पश्चिम सागरी वाहतूक सेवेसाठी जे. कुमार फाऊंडेशन स्पेशालिस्ट फिलिपाईन्स व डीबीएम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर यांची निवड करण्यात आली आहे.
सागरी वाहतुकीला चालना मिळून मुंबईतील लोकल्स व बस या सार्वजनिक वाहतूक सुविधेचा भार कमी व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ प्रयत्नशील आहे. गुरुवारी निवडलेल्या कंत्राटदारांपैकी जे. कुमार अँण्ड फाऊंडेशन यांच्याकडे मुंबईतील बंदर ते नेरूळ या पूर्व सागरी वाहतूक प्रकल्पाचे काम सोपविण्यात आले आहे. यामध्ये कंत्राटदार कंपनीकडे दोन्ही जेट्टींच्या उभारणीबरोबरच नागरिकांसाठीच्या रो रो सेवेचे नियोजनही करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी 308.28 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर फेरी वार्फ ऑरेंज गेट ते कर्नाक बंदर या उन्नत मार्गासाठी 68.48 कोटी रुपयांचे कंत्राट जे. कुमार कंपनीला देण्यात आले आहे. तसेच पूर्व सागरी वाहतुकीच्या प्रकल्पाचाच एक भाग असणार्या मांडव्यापर्यंतच्या सागरी वाहतुकीचा भाग डीबीएम आणि सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर यांना देण्यात आला आहे. त्यासाठी 63.71 कोटी खर्च अपेक्षित आहे. पश्चिम उपनगरांच्या प्रकल्पातील नरिमन पॉईंट ते जुहू या प्रकल्पासाठी जे. कुमार अँण्ड फाऊंडेशन स्पेशालिस्ट फिलीपाईन्स या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी 354.07 कोटी खर्च दर्शविण्यात आला आहे, तर बोरिवली ते मॉर्वे या सागरी वाहतुकीसाठी एचसीसी आणि सद्भव या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्याचबरोबर वांद्रे ते वर्साेवा या सागरी मार्गासाठी डीबीएम आणि सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरला कंत्राट देण्यात आले असून या दोन्ही प्रकल्पांसाठी अनुक्रमे 319 कोटी व 241 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

महिलांच्या निर्घृण हत्या
मुंबई : वडाळा येथील तरुण महिला वकिलावर धारदार शस्त्राने वार करून 16 व्या माळय़ावरील राहत्या घरातच हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. अशाच दुसर्या घटनेत मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह गोणीमध्ये आढळल्याने दहशत पसरली आहे. दोन्ही हत्यांचा तपास पोलीस करीत आहेत.
मुंबई : ताडदेव येथील 10 माळ्याच्या इमारतीला आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून अनेक रहिवाशांची सुटका केली. ताडदेव येथील बस डेपोसमोर असलेल्या एव्हरेस्ट बिल्डिंग या 10 माळ्याच्या रहिवाशी इमारतीच्या नवव्या माळ्याला गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता अचानक आग लागली. या आगीने हा हा म्हणता रौद्ररूप धारण केल्याने 10व्या माळ्यावर राहणारे अनेक लोक अडकले गेले. धुराच्या लोटांमुळे अनेक जण खिडक्यांतून मदतीची हाक देत होते. या आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन 8 फायर इंजिनच्या साहाय्याने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले व अडकलेल्या अनेक रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळवले. या आगीत नववा माळा जळून खाक झाला असून आगीचे कारण समजले नसल्याचे सांगण्यात आले. ताडदेव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अग्निशमन जवानांचे धरणे आंदोलन
मुंबई : आझाद मैदानात शरद राव यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या विविध प्रश्नांसंबंधी धरणे धरले जात असतानाच तसेच याबाबत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याशी शरद राव यांनी चर्चा केल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार संघटनेच्या सरचिटणीस माजी महापौर नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैस्कर यांची गुरुवारी दुपारी तीन वाजता भेट घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली.
या चर्चेत पे बॅण्ड 2 बाबत सकारात्मक चर्चा केली गेली. कर्मचारी वेतन विसंगतीबाबत 3 दिवसांचे वेतन निश्चिती प्रशिक्षण लिपिक यांना देण्यात यावे, प्रशिक्षणाकरिता उपरोक्त संघटनेचे प्रतिनिधींनाही समाविष्ट करून घ्यावे, अशा मागण्या केल्या गेल्या. ज्यादा काम भत्त्याबाबत निर्बध उठविण्यास म्हैस्कर यांनी मंजुरी देत मागील थकबाकी तात्काळ देण्याचे आदेश दिले गेले. 2009 पासून पल्रंबित असलेले गणवेश तीन महिन्यांच्या आत कर्मचार्यांना देण्याचे आदेशही या वेळी दिले गेले. तसेच पी.पी.ई. ड्रेस बनविण्याकरिता विशेष कमिटी स्थापन करण्याचे आदेशही दिल्याचे श्रद्धा जाधव यांनी सांगितले. सर्व प्रवर्गातील पदोन्नतीबाबत संघटनेने दिलेल्या प्रस्तावावर अभ्यास करून रिक्त जागा भरण्याचे निर्देश सी.एफ.ओ. यांना देण्यात आले. अपघात उपचार निधी म्हणून प्रत्येक कमांड सेंटरमध्ये प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचेही या वेळी मान्य केले गेले. कर्मचार्यांना सेवा कालावधीत अपंगत्व आल्यास त्याला त्याच खात्यात समाविष्ट करण्याची मागणीही मनीषा म्हैस्कर यांनी मान्य केल्याचे जाधव यांनी सांगितले. शिवसेना युनियनच्या शिष्टमंडळात श्रद्धा जाधव यांच्यासह कार्याध्यक्ष शरद कुवेसकर, चिटणीस रवींद्र घोसाळकर, राजाराम धुरी, खजिनदार नारायण केदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सव माहिती पुस्तिका-2012 चे महापौराच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका-2012 चे महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. पालिकेत आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत महापौर, आयुक्त सीताराम कुंटे, गणेशोत्सव समन्वय समितीचे सदस्य आणि इतर अधिकारी उपस्थित होते. पुणे येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सव दरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी या काळात पोलीस दल आणि पालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त कुंटे यांनी केले. जनजागृती व लोकप्रबोधनासाठी विविध संवाद माध्यमांचा वापर, कृत्रिम तलाव व निर्माल्य कलश आणि जीवरक्षकांची संख्या वाढवणे याशिवाय मंडळांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. गणेशमूर्तीच्या विक्री केंद्राजवळ कृत्रिम तलावांची मार्गदर्शक माहिती पुरवण्याची सूचना यावेळी आ. विनोद घोसळकर यांनी केली. कोळी बांधवांमार्फत नागरिकांच्या सोईसाठी गणेशमूर्तीच्या विसर्जनाची अल्प शुल्क आकारून सोय करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. शाडू मातीच्या व कमी उंचीच्या गणेशमूर्तीसाठी भाविकांनी आग्रह धरावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी केले.
रोजादरम्यान बळजबरीने जेवण देणे योग्य आहे का?
मुंबई : महात्मा गांधी यांच्या खिलाफत चळवळीच्या मंथनातून निघालेल्या विचाराप्रमाणे प्रत्येक धर्माने आपापल्या संस्कृतीने रक्षण करावे, पूर्जाअर्चा करावी, असे असताना मुस्लीम समाजाला रोजा असताना त्याला नमाज पडू देऊ नये, बळजबरीने जेवू घालणे हे कितपत योग्य आहे, असा सवाल भारत बचाव आंदोलनाचे राष्ट्रीय निमंत्रक किशोर जगताप यांनी गुरुवारी पत्रकार संघ येथे केला.
चीनमध्ये व इतर देशांमध्ये ज्या मुस्लिमांनी रोजा धरला आहे, त्यांना बळजबरीने जेवण देणे, तसेच रोजा मोडण्यासाठी प्रवृत्त करणार्या देशांविरोधात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. भारतामध्येही त्याचे पडसाद पडत आहेत.मानवजातीच्या कल्याणासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला याबाबत पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती या वेळी मुस्लीम नेते सिराज सिद्दिकी यांनी दिली. भारतामध्ये 30 कोटी मुस्लीम आहेत, त्यांच्या वतीने पंतप्रधानांनी चीन व इतर मुस्लीमद्वेष्टय़ा देशांना तसेच संयुक्त राष्ट्रसंघाला पत्रव्यवहार करावा, अशी मागणी किशोर जगताप यांनी या वेळी केली.

आरोग्य शिबिरांचे आयोजन
मुंबई : मुंबई आरोग्य अभियानाअंतर्गत रविवारी मुंबईच्या संवेदनशील विभागात सार्वजनिक आरोग्य खाते, वैद्यकीय महाविद्यालय व सर्वसाधारण रुग्णालये यांच्या एकत्रित सहभागाने विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. हे आरोग्य शिबीर 12 ऑगस्ट रोजी होणार असून के-पूर्व येथे दोन ठिकाणी तर आर-दक्षिण आणि एन वॉर्डमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.पालिकेने 3 जून 2012 पासून दर रविवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आतापर्यंत 35 आरोग्य शिबिरांचे आयोजन केले गेले आहे. 12 ऑगस्ट 2012 रोजी घेण्यात येणारे आरोग्य शिबीर के - पूर्व विभागातील भाटकर चाळ, जिजामाता मार्ग, अंधेरी (पूर्व) व मरोळ चर्च रोड, अंधेरी (पूर्व) या दोन ठिकाणी तसेच आर. दक्षिणमध्ये साईनगर, एम. जी. क्रॉस रोड नं. 1, कांदिवली (पश्चिम) या ठिकाणी आणि एन विभागात भटवाडी, बर्वे नगर, घाटकोपर (पश्चिम) येथे या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या आरोग्य शिबिरांमध्ये सर्वसाधारण बाह्य रुग्ण विभाग, बालरोग विभाग, हिवतापासाठी रक्ततपासणी, संशयित क्षयरोगांसाठी थुंकी तपासणी, मधुमेहाची तपासणी, रक्तदाब तपासणी, लसीकरण या सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे एच 1 एन 1 फ्ल्यू आजाराची माहिती देण्यासाठी प्रत्येक आरोग्य शिबिरात विशेष कक्ष उपलब्ध केले आहेत. सर्व शिबिरांमध्ये मोफत औषधे दिली जात असून आतापर्यंत झालेल्या सर्व शिबिरात 12 हजार 870 जणांनी लाभ घेतल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकार्यांकडून सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment