पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला
10 दहशतवादी ठार
एका दहशतवादी संघटनेने पाकिस्तानच्या लष्करी विमानतळावर हल्ला केला आहे. पंजाब प्रांतातील कामरा हे पाकिस्तानी लष्कराचे महत्त्वपूर्ण विमानतळ आहे. त्या ठिकाणी दहा दहशतवादी घुसले असून, त्यांच्याशी सुरक्षा यत्रंणा दोन हात करीत आहेत. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, पाक लष्कर आणि दहशतवादी यांच्यातील चकमक संपली आहे. दहापैकी बहुतेक दहशतवादी मारले आहेत. यातील एकाचा मृतदेह हाती लागला आहे.
पाकिस्तानमधील जिओ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री २ च्या सुमारास दहा दहशतवादी पाकिस्तान लष्कराच्या वेषात कामरा विमानतळात घुसले. त्यानंतर त्यांनी सशस्त्र हल्ला चढविला. यानंतर पाक सेना व दहशतवादी यांच्यात सुमारे तीन-चार तास चकमक झाली. यात बहुतेक दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच एका दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागला आहे. पाक लष्कराचा एक सुरक्षारक्षक या चकमकीत शहीद झाला आहे.


No comments:
Post a Comment