राज्यात कृत्रिम पाऊस नाही

मुलुंड येथील गोवर्धन नगरात कापडी आणि विघटनशील पदार्थापासून बनवण्यात आलेल्या पिशव्यांच्या वितरणाचा कार्यक्रम महापौर सुनील प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्लास्टिकच्या पिशव्या टाळून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन या वेळी महापौरांनी केले. नगरसेवक मनोज कोटक, नगरसेविका भावना जोबनपुत्रा, गोवर्धन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी असोसिएशनचे अध्यक्ष जयंत देशमुखसहित इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.
काही वर्षापूर्वी बारामती येथून राज्याच्या काही भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. पण, असा पाऊस एकाच जागेवर पडतो. कृत्रिम पाऊस हा न परवडण्यासारखा आहे. या सर्व बाबी लक्षात घेता कृत्रिम पावसाचा प्रयोग यंदा राबविणे शक्य ठरणार नसल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याचे पाणी, चारा उपलब्धतेबरोबरच पशुधन व उभी पिके वाचवण्याची जबाबदारी सरकारवर असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला, द्वितीय प्राधान्य चारा उपलब्धतेला व नंतर उभी पिके व फळबागा वाचवण्यासाठी देण्यात येणार असून, तशा सूचनाही संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसाठय़ावर याचा परिणाम झाला आहे. पाण्याचे नियोजन केले तरच आपण दुष्काळाचा सामना करू शकतो. यासाठी या बैठकीमध्ये पाण्याचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे.
१२७ सनदी अधिकार्यांविरुद्ध कारवाईचा सरकारचा विचार
नवी दिल्ली : अद्यापि एकदाही स्थावर मालमत्तेचा परतावा न भरणार्या देशभरातील 127 सनदी अधिकार्यांविरुद्ध केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित अधिकार्यांची वेतनवाढ आणि नियुक्ती रोखण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याचे मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. ताज्या आकडेवारीनुसार 127 सनदी अधिकार्यांपैकी मध्य प्रदेशातील 32 अधिकारी, उत्तर प्रदेशातील 16 अधिकारी, पंजाबमधील 14 आणि ओडिसातील 12 अधिकार्यांचा समावेश आहे. याशिवाय आंध्र प्रदेशातील 8, हरयाणा 7, कर्नाटक 7 अधिकारी तसेच अरुणाचल प्रदेश, गोवा, मिजरेराम, उत्तराखंड, नागालँड, मणिपूर व त्रिपुरा या राज्यांतील 4-4 अधिकारी, पश्चिम बंगालमधील 3, आसाम व तामिळनाडूतील 2-2, तर छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, केरळ, सिक्कीम आणि राजस्थान मधील एक-एक सनदी अधिकार्यांनी स्थावर संपत्तीचा परतावा भरला नाही.
"ट्राय'चे मोबाईल कंपन्यांना नवे निकष लागू
मुंबई- "धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय' अशा पेचात सध्या मोबाईल कंपन्या सापडल्या आहेत. जाहिरातीतून विनाव्यत्यय नेटवर्कचे तुणतुणे वाजविणाऱ्या कंपन्यांची तार "ट्राय'ने तोडली आहे. नागरिकांच्या आरोग्यावर होणारा "इलेक्ट्रिक मॅग्नेटिक रेडिएशन'चा परिणाम कमी करण्यासाठी नवे निकष लागू केले आहेत. त्यामुळे नेटवर्कशी संबंधित असलेल्या "इलेक्ट्रिक मॅग्नेटिक रेडिएशन'ची तीव्रता कमी होऊन त्याचा परिणाम "रेंज'वर होणार आहे. म्हणूनच कंपन्यांना नेटवर्क कायम ठेवण्यासाठी अधिक टॉवर उभारावे लागणार आहेत. या कालावधीत ग्राहकांना "रेंज' कमी मिळत असल्याच्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
"इलेक्ट्रिक मॅग्नेटिक रेडिएशन'ची तीव्रता कमी केल्याने आधीच्या नेटवर्कच्या तुलनेत नव्या नेटवर्कची तीव्रता कमी असेल. त्यासाठी नव्या तीव्रतेनुसार नेटवर्क पोचविण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी विशिष्ट अंतराने टॉवर उभारण्याचे काम हाती घेतले आहे. नेटवर्कसाठी वापरण्यात येणारी "इलेक्ट्रिक मॅग्नेटिक रेडिएशन'ची सध्याची 9.2 वॅट प्रतिचौरस मीटर ही मर्यादा घटवून 0.92 वॅट प्रतिमीटर इतकी करण्यात आल्याचे दूरसंचार विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे सध्याची एक किलोमीटरपर्यंतच्या सरासरीत घट होईल. त्यामुळे मुंबईतील टॉवर्सची 24 हजार ही संख्या दुपटीने वाढण्याचे संकेत आहेत.
"नकोसे' एसएमएस पाठविणाऱ्या कंपन्यांवर ट्रायचा कारवाईचा बडगा
मुंबई- आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी हातमिळवणी करून, तसेच टेलिमार्केटिंगसाठी क्लृप्त्या लढवून "नकोसे' एसएमएस पाठविणाऱ्या कंपन्यांवर दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) कारवाईचा बडगा उगारणार आहे. अवघी एक तक्रार आली तरीही "डू नॉट डिस्टर्ब'ला बगल देणाऱ्या मोबाईल कंपनीची सेवा खंडित करण्याचे, तसेच मोठा दंड आकारण्याचे संकेत "ट्राय'ने दिले आहेत.
अपंगांच्या टेलिफोन बूथवर महापालिकेची करावाई होणार नाही - महापौर
मुंबई- मुंबईतील पदपथांवरील अपंगांच्या टेलिफोन बूथवर महापालिकेचे अधिकारी कारवाई करतात. परंतु यापुढे अशी करावाई होणार नाही आणि झालीच तर त्याची दखल घेतली जाईल, अशी ग्वाही मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी दादर येथील कमला महेता अंधशाळा येथील शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात व्यक्त केले. या कार्यक्रमात महापौरांनी अपंगांचे प्रश्न पालिकेत तातडीने सोडविले जातील आणि त्यांच्या बूथवर कोणतीही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही दिली.
शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात अंधशाळेतील मुलींना गणवेश आणि बॅगचे वाटप केले. या कार्यक्रमाला नगरसेविका वैभवी चव्हाण, माजी नगरसेवक दिलीप शिंदे, लता रहाटे, शाखाप्रमुख यशवंत विचले, दत्ता पोंगळे, शाळेचे विश्वस्त सुपर्णा आजगावकर आणि मुख्याध्यापिका उमा मुंबईकर, शिवसेनेच्या महिला शाखा संघटक कामिनी मिश्रा, शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, सुभाष कदम, परेश रांभिया, संचिता मोरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण राणे यांनी केले.
मुलुंड येथील गोवर्धन नगरात कापडी आणि विघटनशील पदार्थापासून बनवण्यात आलेल्या पिशव्यांच्या वितरणाचा कार्यक्रम महापौर सुनील प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्लास्टिकच्या पिशव्या टाळून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन या वेळी महापौरांनी केले. नगरसेवक मनोज कोटक, नगरसेविका भावना जोबनपुत्रा, गोवर्धन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी असोसिएशनचे अध्यक्ष जयंत देशमुखसहित इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment