प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी
मुंबई : स्वातंर्त्यदिनी नागरिकांनी प्लास्टिकचे ध्वज वापरणे टाळावे, असे आवाहन महापौर सुनील प्रभू यांनी केले आहे. प्लास्टिकमुळे होणार्या प्रदूषणामुळे महापौरांनी हे आवाहन केले आहे.
प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे प्लास्टिकचे प्रमाण वाढून पर्यावरणाचे संतुलन ढासळत आहे. तसचे प्लास्टिक जाळल्यामुळे विषारी धूर निर्माण होऊन वायुप्रदूषण होते. गेल्या काही काळात प्लास्टिकपासून बनवण्यात येणारे तिरंगे बाजारात मोठय़ा प्रमाणावर दिसत आहेत.लहान मुलांकडून राष्ट्रध्वजचा चुकून अवमान होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच प्लास्टिकचे ध्वज गटारात चुकून पडून राहल्यास पाणी तुंबण्याचा धोका असतो. राष्ट्राच्या प्रतिमेला ही बाब शोभरणार नाही. या पाश्र्वभूमीवर प्लास्टिकचे राष्ट्रध्वज न वापरण्याचे आवाहन प्रभू यांनी केले आहे.

प्रतिबंधित प्लास्टिकच्या पिशव्यांवर मुंबई महापालिकेने बंदी घातलेली असतानाच आता प्रतिबंधित प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. स्वातंर्त्य दिनाच्या दिवशी प्लास्टिकच्या झेंडय़ांची मोठय़ा प्रमाणात विक्री केली जाते. झेंडावंदन झाल्यानंतर हे झेंडे रस्त्यावर आणि कचर्यात पडलेले आढळतात. त्यामुळे ध्वजाचा अपमान होतो. याची गांभीर्याने दखल घेऊन प्रतिबंधित प्लास्टिकच्या झेंडय़ांची विक्री करणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचे झेंडे विकणार्यांकडून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment