एक ‘फूट’ मृत्युच्या दारात ......
मुंबई : रशीद इनामदार
मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली मुंबई ची लोकल ट्रेन. या लोकल ट्रेन ने मुंबई तील मध्यमवर्गीय जनता प्रवास करते . रस्ते प्रवासात वेळ लागतो आणि ती जास्त खर्चिक हि असते त्यामुळे मुंबई करांची पहिली पसंती लोकल ट्रेन लाच असते .परंतु बऱ्याचदा रेल्वे प्रशासन प्रवाशांना चांगली सेवा देण्यास प्रयत्नशील राहूनही काही ठिकाणी दुर्लाश होताना दिसते . असाच काहीस पश्चिम रेल्वे च्या दादर या मुख्य रेल्वे स्थानकाच्या बाबतीत झालंय .
फलाट क्रं.४ जे चर्चगेट कडे जाणाऱ्या जलद गाडयांच प्लातफोर्म आहे त्यात आणि गाडीच्या मध्ये एक फूटाच अंतर निर्माण झालंय .काही ठिकाणी त्याहून जास्त . एखाद्या प्रवाश्याचा पाय गाडीत चढता उतरताना जाऊन गंभीर अपघात होऊ शकतो किंवा प्रवाशाच्या जीवावर हि बेतू शकतं. हे स्थानक नेहमीच प्रवाशांनी गजबजलेलं असता आणि दररोज लाखो प्रवाशी या स्थानकावरून ये जा करत असतात. त्यात सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी घाई गडबड आणि त्यामुळे धक्काबुक्की मोठ्या प्रमाणात होते. प्लातफोर्महि अरुंद आहे.तेंव्हा अपघात होण्याची शक्यता वाढते.महिला आणि वृद्धांना या समस्ये मुळे त्रास सहन करावा लागत आहे .त्यांना उतरायला उशीर लागतो आणि मागील प्रवासी उतरण्याच्या घाईत बहुतेकदा त्यानाही धक्का बुक्की करतात.
दर रविवारी मेगा ब्लॉक करून दुरुस्तीची कामे करून आठवडाभर चांगली सेवा देऊ पाहणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडून ह्या बाबीकडे दुर्लक्ष का होत आहे ?.रेल्वे track ची उंची वाढलेली त्यांना माहितच नसेल का ? या चुकीमुळे एखादा जीव जाण्याची वाट रेल्वे प्रशासन पाहत आहे का ? असा संतप्त सवाल रेल्वे प्रवाशी करताना दिसत आहेत. पण पश्चिम रेल्वे ने दादर वरून प्रवाशांच मृत्युच्या दारापासून अंतर आता फक्त एक फूटच राहिलंय हे मात्र खरं .........


No comments:
Post a Comment