भारतीय ईशान्य नागरिकांच्या पाठिशी - पंतप्रधान मनमोहन सिंग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2012

भारतीय ईशान्य नागरिकांच्या पाठिशी - पंतप्रधान मनमोहन सिंग

भारतीय ईशान्य नागरिकांच्या पाठिशी - मनमोहन सिंग

अफवांना बळी पडून ईशान्य भारतातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. भारताचा प्रत्येक भाग जसा इतर प्रांतातील नागरिकांचा आहे तसाच ईशान्येकडील भारतीयांचाही आहे. त्यांना येथे सन्मानाने राहण्याचा, काम करण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज (शुक्रवार) राज्यसभेत केले. 
    मनमोहनसिंग म्हणाले, की ईशान्येकडील भारतातील परिस्थिती गंभीर आहे. वांशिक हिंसाचारामुळे देशातील एकतेवर संकट आले आहे. आपण सर्वांनी मिळून ही समस्या सोडविण्यासाठी मिळून प्रयत्न करायला हवे. देशातील इतर भागांमध्ये अफवांचे पीक आले असल्यामुळे तेथील ईशान्येकडील नागरिक भयग्रस्त झाले आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. भारत हा देश जसा इतर प्रांतातील नागरिकांचा आहे, तसाच ईशान्येकडील भारतीयांचाही आहे. ईशान्येकडील भारतीयांना देशात सुरक्षित वाटावे यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात सर्व मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करणार आहे. 
    त्यापूर्वी लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या, की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हे ईशान्येकडील भारतीयांना सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भारत हा देश ईशान्येकडील नागरिकांचा असल्याचे आपण एका आवाजात सांगायला हवे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS