फ्याब्सच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात नोकरीची संधी

मुंबई / अजेयकुमार
सायट्रस चेक इन्स आणि मुंबई स्थित फझलानी ओल्तिअस बिझनेस स्कूल (फ्याब्स) यांच्या झालेल्या अभूतपूर्व भागीदारीच्या करारामुळे देशातील प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात रोजगार निमितीस हातभार लागणार आहे. फ्याब्स संस्थेच्या विद्यार्थ्यांना सायट्रस कंपनी मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असून अभ्यासक्रम पूर्ण होताच नोकरीत सामावून घेतले जाईल असे साय्त्रास्चे सोमनाथ पाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्थावर मालमत्ता विकास, आदरतिथ्य, प्रवास, पवन उर्जा निर्मिती,संगणक प्रशिक्षण,वस्त्रोद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अशा विविध क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या मिहार समूहाची सायट्रसही घटक कंपनी आहे. या कंपनी द्वारे फ्याब्स स्कूलच्या माध्यमातून दोन वर्ष कालावधीचे पोस्ट ग्र्यजुएत प्रोग्राम ईन मार्केटिंग अन्ड सेल्स व सोसायटी ऑफ ह्युमन रिसोर्स म्यानेजमेंट सोबत पोस्ट ग्र्यजुएअत ईन हुमण रिसोर्स म्यानेजमेंट हे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.हे अभ्यासक्रम यु जी सी मान्यताप्राप्त विद्यापीठाशी सलग्न आहे
सुरुवातीस ३० विद्यार्थ्यांना रोजगाराची हमी दिली असून देशाला अपिरीचीत असलेल्या टाईम शेअर इंडस्ट्री संकल्पनेचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना अभ्यासक्रम पूर्ण होण्या पूर्वीच कंपनीत नेमणुकीचे पत्र देणार आहोत. हे विद्यार्थी उत्तम करिअर घडवतील याची काळजीही घेणार आहोत असे पाल यांनी सांगितले. यावेळी शैक्षणिक क्षेत्र व्यापार क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांनी एकत्रित विचार विनिमय करून उद्योगासाठी तयार अभ्यासक्रम निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे असे फ्याब्स शिक्षण संस्थेचे मुस्ताक आलम यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment