| मुंबई : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव २३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या युवक महोत्सवाचे उद््घाटन अभिनेता पंढरीनाथ (पॅडी) कांबळे यांच्या हस्ते सकाळी १0 वाजता विद्यापीठाच्या नवीन दृक्श्राव्य इमारतीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार हे भूषवणार आहेत. पारंपरिक महाविद्यालयांप्रमाणेच मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी युवक महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. विद्यापीठाच्या अमरावती, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, कल्याण आणि सोलापूर या १0 विभागीय केंद्रांवर एकांकिका, लोकनृत्य, समूह गायन, स्कीट, मिमिक्री, माईम, सुगम गायन, पाश्चात्त्य गायन, शास्त्रीय गायन, वाद्यवादन, शास्त्रीय नृत्य, वक्तृत्व स्पर्धा, क्वीज, वादविवाद स्पर्धा, क्ले मॉडेलिंग, पेंटिंग, रांगोळी, पोस्टर मेकिंग, फोटोग्राफी, कोलाज, कार्टून यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विभागीय पातळीवर झालेल्या निरनिराळ्या स्पर्धांच्या प्राथमिक फेरीत एकूण ८६ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत केंद्रीय युवक महोत्सवात स्थान मिळविले आहे. यात ५५ मुले तर ३१ मुलींचा समावेश आहे. |
Post Top Ad
19 November 2013
Home
Unlabelled
मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव २३ नोव्हेंबरला
मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव २३ नोव्हेंबरला
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment